Wednesday, 10 April 2019

योग्य तपासण्या करून आरोग्याबाबत निश्चिंत बना


नगर । प्रतिनिधी -
चैत्राच्या नव्या पालवीसह गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नूतन मराठी वर्षाला प्रारंभ होत आहे. या प्रसन्नचित्त वातावरणात प्रत्येकाला उत्तम शारीरिक आरोग्य लाभावे अशा सदिच्छा व्यक्त करीत नगरमधील अहमदनगर पॅथकेअरने आपल्या दर्जेदार लॅबमधील विविध आरोग्य तपासण्या अतिशय सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्या आहेत. ‘ध्यास निरोगी नगरचा’ या ब्रीदवाक्यानुसार अहमदनगर पॅथकेअरने 2 हजार रुपये खर्चाच्या विविध चाचण्या अवघ्या 500 रुपयांत उपलब्ध करून देत नगरकरांना आरोग्यमय शुभेच्छा दिल्या आहेत. आजार झाल्यावर उपचार करण्याऐवजी आजारी पडण्याआधीच योग्य तपासण्या करून भविष्यातील आरोग्याच्या तक्रारी नाहीशा व्हाव्यात यासाठी या विशेष सवलत योजनेचे आयोजन केल्याची माहिती अहमदनगर पॅथकेअरच्यावतीने देण्यात आली आहे.
सध्याच्या काळात वैद्यकीय सेवा दर्जेदार होत असल्या तरी महागड्याही होत आहेत. रूग्ण डॉक्टरांकडे गेल्यावर त्याला विविध तपासण्या करण्याचा सल्ला दिला जातो. या तपासण्यांच्या रिपोर्टवर डॉक्टर उपचार निश्चित करतात. त्यामुळे या खर्चिक तपासण्या अल्पदरात उपलब्ध झाल्यास रूग्णांना मोठा दिलासा मिळू शकतो. अहमदनगर पॅथकेअरने नगरमध्ये अत्याधुनिक लॅब सुरू करताना व्यवसाय व सामाजिक बांधिलकीची सांगड घालत सर्व तपासण्या अतिशय कमी दरात उपलब्ध करून दिल्या आहेत. तोफखाना परिसरात छाया टॉकीजमागे सुप्रभा इमारतीत सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज अशी अहमदनगर पॅथकेअर सर्वसामान्यांसाठी हक्काचे आरोग्य तपासणी केंद्र बनले आहे. मागील दोन महिन्यात विविध शिबिरांच्या माध्यमातून हजारो रूग्णांना सवलतीच्या दरातील तपासणी सेवेचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. या उपक्रमासाठी अहमदनगर पॅथकेअरला विविध सामाजिक संस्था, दानशूरांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. आताच्या 500 रुपये सवलतीच्या पॅकेजमध्ये  हिमोग्राम, ब्लड शुगर एफ ऍण्ड पीपी, लिपीड प्रोफाईल, युरिक अ‍ॅसिड, युरिन टेस्ट अशा अनेक व वेगवेगळ्या पॅकेजमध्ये तपासण्या करण्यात येणार आहेत. या तपासणीसाठी रूग्णांनी 0241-2342699 व 9527078805 या दूरध्वनी क्रमांकावर नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळी 7 ते रात्री 9 यावेळेत अहमदनगर पॅथकेअरची सेवा सर्वांसाठी उपलब्ध आहे. याशिवाय नगरकरांना थेट घरपोच सेवाही दिली जाणार आहे. सर्व तपासण्या अचूक होण्यासाठी याठिकाणी अत्याधुनिक व जागतिक दर्जाच्या मशिनरीज लावण्यात आल्या आहेत. यात एचपीएलसी तंत्रज्ञानाचे एचबीएआयसी मशिन, मॅग्नेस्टिक स्टरर असलेले मिस्पा मशिन, इलेक्ट्रोलाईट थ्री पॅरामीटर ऑटोमेटेड, पूर्ण ऑटोमेटेड बायोकेमिस्ट्री मशिन, न्युऑन कोडेन, सेमी अ‍ॅटोमेटेड आर्करे बायोकेमिस्ट्री मशिन तसेच नगरमध्ये प्रथमच पूर्ण अ‍ॅटोमेटेड युरिन अ‍ॅनालायझर मशिनही येथे आहे. या सर्व मशिन जपानी तंत्रज्ञानाच्या असल्याने रिपोर्ट उच्च दर्जाचे व अचूक असतील. मोठ्या महानगरांमधील लॅबच्या तोडीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान व तज्ज्ञ डॉक्टरांचे सहकार्य या पॅथकेअरमुळे नगरकरांना मिळाले आहे.
अल्पदरात अत्याधुनिक तपासण्यांची सुविधा देतानाच सामाजिक बांधिलकी जपण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. याठिकाणी हेमॅटोलॉजी, बायोकेमिस्ट्री, क्लिनिकल पॅथॉलॉजी, सेरोलॉजी, मायक्रोबायोलॉजी, हार्मोन्स, सीए मार्कर्स (कॅन्सर तपासणी), अ‍ॅडव्हान्सड् पॅथॉलॉजीकल सेटअप, ब्लड, युरिन टेस्ट अशा अनेक सोयी सुविधा एकाच छताखाली उपलब्ध आहेत.

No comments:

Post a Comment