Monday, 15 April 2019

अहमदनगर जिल्हा एरियल सिल्क स्पर्धा दि. 21 एप्रिल रोजी


नगर । प्रतिनिधी -
नगरमध्ये  पहिली जिल्हास्तरीय एरियल सिल्क स्पर्धा व कै. र. दा. मोहोळे स्मृती करंडकाचे आयोजन  रविवार दि 21 एप्रिल रोजी करण्यात आले आहे. ही स्पर्धा अहमदनगर जिल्हा एरियल स्पोर्टस् असोसिएशन, कै. र. दा. मोहोळे शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने व श्री रामअवतार मानधना चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने आयोजित केली आहे.
या स्पर्धेत शाळा, कॉलेज व संस्थेतील मुले व मुलींचा संघ सहभागी होऊ शकतो. स्पर्धेत उपस्थित सर्व खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येतील. तसेच प्रत्येक गटात विजेत्या 3 स्पर्धकांना प्राविण्य प्रमाणपत्र व मेडल देण्यात येईल. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट संघास कै. र. दा. मोहोळे स्मृती करंडक हा फिरता करंडक प्रदान करण्यात येणार आहे. ही स्पर्धा 8 ते 11, 12 ते 14 , 15 ते 17 18 ते 20 व 21 वर्षांवरील वयोगटाप्रमाणे मुले व मुली वैयक्तिक व पुरुष जोडी, महिला जोडी व मिश्र जोडी या प्रकारात घेण्यात येईल. सर्व खेळाडूंनी आपल्या शाळेच्या नावाने प्रवेशिका पाठवावी. स्पर्धेसाठी 31 डिसेंबर 2019 रोजी जे वय पूर्ण असेल ते ग्राह्य धरले जाईल. प्रत्येक संघाने आपली प्रवेशिका 18 एप्रिलपर्यंत जिल्हा सचिव प्रणिता तरोटे  मो. 9545459111 यांच्याकडे जमा करावी. सोबत आधारकार्ड व जन्मतारखेचा दाखला झेरॉक्स प्रतीसह एक पासपोर्ट साईज फोटो पाठवावा.
स्पर्धा रामअवतार मानधना चॅरिटेबल ट्रस्टचे बालभवन, मानधना फार्मसमोर, महालक्ष्मी गार्डनजवळ, अहमदनगर येथे रविवार दि 21 एप्रिल  रोजी होणार आहेत. तसेच पारितोषिक वितरण दुपारी 3 वाजता होणार आहे.
जिल्ह्यातील सर्व खेळाडूंनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन अहमदनगर जिल्हा एरियल स्पोर्टस् असोसिएशनचे अध्यक्ष उमेश झोटिंग, सचिव  प्रणिता तरोटे, उपाध्यक्ष प्रशांत मोहळे, क्षितिजा हडप, अ‍ॅड. नीलेश हराळे, प्रणिता झोटिंग, श्वेता तरोटे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment