Saturday, 13 April 2019

स्वराज कामगार संघटनेच्या प्रयत्नांमुळे 33 कामगार बनले प्रशिक्षणार्थी कर्मचारी


नगर । प्रतिनिधी -
एमआयसीडीमधील कंपन्यांमध्ये शेतकर्‍यांची मुले आणि स्थानिक कामगारांच्या हाताला काम मिळावे, त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी स्वराज्य कामगार संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असून एक्साईड कंपनीत संघटनेच्या प्रयत्नांमुळे 33 कंत्राटी कामगारांना प्रशिक्षणार्थी कर्मचारी म्हणून नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. संघटनेमुळे या पूर्वी या कंपनीत 265 कामगारांना कायम सेवेत घेण्यात आलेले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष योगेश गलांडे यांनी दिली.
एमआयसीडीमधील एक्साईड कंपनीत स्वराज्य कामगार संघटना कार्यरत आहे. या कामगार संघटनेच्या माध्यमातून कंपनी स्थापनेपासूनच कामगारांना न्याय मिळवून दिला आहे. स्वराज्य कामगार संघटनेने नेहमीच कंपनी व्यवस्थापन व कामगार यांच्यातील दुवा म्हणून काम केले आहे. कामगार हिताचे निर्णय घेण्यास कंपनीस भाग पाडले. कामगार कायद्याप्रमाणे त्यामुळे कामगारांना न्याय मिळू शकला. कंपनीत अनेक दिवसांपासून कंत्राटी कामगार कार्यरत असून, त्यांना कायम सेवेत घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कंपनीने या कामगारांना कायम सेवेत घ्यावे, अशी आमची मागणी होती, त्यासाठी यापूर्वी आंदोलने केली होती. कंपनी व्यवस्थापनासोबत बैठका घेत चर्चा केली. कंपनीचे कामकाजही चांगल्या पद्धतीने व्हावे आणि कामगारांना न्यायही मिळावा अशी आमची भूमिका असल्याचे गलांडे म्हणाले.
यावेळी कंपनीचे अधिकारी सुब्रतो सिन्हा, संतोष डबीर, स्वराज्य कामगार संघटनेचे आकाश दंडवते, अय्याज सय्यद, भरत दिंडे, संतोष गायकवाड, सचिन भुसारी, शिंदे, चांदणे, गाडे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment