नगर । प्रतिनिधी -
रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनचे अध्यक्ष तथा उद्योजक मनीष नय्यर यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने वाहन नियम व रस्ता सुरक्षतेसंदर्भात केलेल्या जागृतीबद्दल तसेच रोटरीच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याबद्दल कोलंबो (श्रीलंका) येथे पुरस्काराने गौरविण्यात आले. नय्यर यांनी वाहतुकीचे नियम व रस्ता सुरक्षा संदर्भात महावॉकेथॉन आयोजित करुन या विषयी जागृती केली होती. तर कोलंबो (श्रीलंका) येथे नुकतीच रोटरी क्लबची आंतराष्ट्रीय परिषद पार पडली. यामध्ये विविध सामाजिक कार्य केल्याबद्दल त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment