नगर । प्रतिनिधी -
नुकत्याच परिक्षा संपून सुट्या सुरु झाल्या आहेत. परंतु अनेक मुले ही मोबाईल, व्हीडिओ गेम, कॉम्प्युटरमध्ये अडकून पडलेले दिसत आहेत. यामुळे मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे, याचा पालकांनी विचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी किमान सुट्टीत मुलांना मैदानी खेळाकडे वळविले पाहिजे. कराटे खेळामुळे आत्मसंरक्षणाचे धडे मिळून आरोग्यही चांगले राहू शकते. आज विविध बेल्टमध्ये यशस्वी झालेल्या खेळाडूंनी कठोर मेहनत घेऊन हे यश संपादन केले आहे. त्यामुळे पुढील काळात त्यांच्या आणखी विकास होईल, असे प्रतिपादन वर्ल्ड फुनाकोशि शोतोकान कराटे संस्थेचे मुख्य प्रशिक्षक हारुण शेख यांनी केले.
वर्ल्ड फुनाकोशि शोतोकान कराटे संस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध बेल्ट परिक्षेतील विद्यार्थी बेल्ट प्रदान करण्यात आले. याप्रसंगी मुख्य प्रशिक्षक हारुण शेख, प्रशिक्षक रमजान शेख, तन्वीर खान, अब्दुल शेख, ईशिता झंवर, मयुर माने, सोनल मिश्रा, प्रबोध बन, यश तासतोडे, बिलाल शेख, ईशान होसिंग, राहुल वाघ आदि उपस्थित होते.
संस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध बेल्ट परिक्षेतील यशस्वी खेळाडू पुढीलप्रमाणे : यल्लो बेल्ट - आर्यन गव्हाळे, ओमकार कवडे, स्पर्श भंडारी, प्रांजल पारधी, सई हरबा, श्लोक रानमळकर, अहम नहार, त्रिजल मेघानी, अनन्या झरकर, अमेय झरकर. ऑरेंज बेल्ट - शिवक्रांती विश्वकर्मा, स्वरा मुनोत, विधी गुंदेचा, प्रगती बागल, माही कवळे. ग्रीन बेल्ट - कृष्णा कोरडे, तनवी वारुळे, विराज होनराव, हर्षद खराडे, अभिनव काकडे, यशश्री कोरडे, शांभवी होनराव, श्रीजन विश्वकर्मा, विराज कांबळे, मुग्धा जेठे, आराध्या रोहमी, आर्यन गोरे, वैभवी भांबरे.
ब्लू बेल्ट - वैष्णवी खराडे, चिराग शिंगवी, साची पवार, उदय त्र्यंबके, आदित्य केदारी, अभि बंग, अदित्य साठे, सलज मिश्रा, आदित्य दरेकर, ओमकार माने. पर्पल बेल्ट - अवधूत बुरगुले, सिद्धार्थ थोरे, वैष्णवी भांबरे. ब्राऊन बेल्ट - करिष्मा क्षत्रिय, प्रांजल खाडे, तुळसीदास सोंडगे, प्रज्वल खाडे, ओमराज कदम, मयंक दिवटे, विशाल थोरे, समर्थ बोरुडे, वैष्णवी आबोलू, प्रीती जेठे. गोल्डन ब्राऊन बेल्ट - पुष्कर कापकर, यश कुलथे. ब्लॅक बेल्ट - आश्विन चंगेडे, ओमकार शिंदे, प्रतिक व्यवहारे.वरील सर्व खेळाडूंना बेल्ट प्रदान करण्यात आले. सर्व यशस्वी खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment