नगर । प्रतिनिधी-
सरकारने जाचक जीएसटी कर आणून व नोटाबंदी करुन संपूर्ण भारताची अर्थव्यवस्था अडचणीत आणली. राफेलचा घोटाळा, संरक्षण खात्यातीलही महत्वाचे कागदपत्रे सुरक्षित ठेवू शकत नाही. शेतकर्यांच्या आत्महत्या थांबू शकत नाही. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी, उद्योजक असे सर्वचजण या भाजपच्या सरकारच्या काळात अडचणीत आले आहेत. अतिरेकी हल्ला होऊन चाळीस निरपधार सैनिक मारले जातात, तेव्हा कुठे गेली होती ही 56 इंच छाती, अशा भाजपाच्या सरकारच्या हातात आपला भारत देश सुरक्षित नाही. त्यामुळे नागरिकांनी याचा विचार करावा. नगरचा उमेदवार कसा असावा, हे ठरवतांना मी विचार केला की, उमेदवार नम्र असावा, आलेल्यांशी माणुसकीने वागणारा, मिळालेल्या पदाची व अधिकाराची हवा डोक्यात गेलेली नसावी. यासर्वांचा विचार करुन आमदार संग्राम जगताप सारख्या तरुण कार्यकर्त्यास नगर दक्षिणची उमेदवारी दिली. आता जनतेने ही निवडणूक हातात घेऊन या विकासाचा दृष्टीकोन असलेल्या उमेदवारास निवडून द्यावे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.
खा. शरद पवार सोमवारी दिवसभर नगरमध्ये उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी थांबले होते. सायंकाळी बडीसाजन मंगल कार्यालयात अहमदनगर शहर व्यापारी मंडळाच्यावतीने आयोजित शहरातील व्यापारी उद्योजकांच्या मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, पुणे मर्चंटस् असोसिएशनचे अध्यक्ष पोपट आस्तवाल, वालचंद संचेती, राजेश फुलपगार, आ.जितेंद्र आव्हाड, आ. अरुण जगताप, आ. सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आ. दादाभाऊ कळमकर, उमेदवार आ. संग्राम जगताप, निरिक्षक अंकुश काकडे, निवृत्ती आरु, सुजित झावरे आदिंसह मोठ्या संख्येने व्यापारी, उद्योजक उपस्थित होते.
उमेदवार संग्राम जगताप म्हणाले, माझी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी ही निवडणूक एकतर्फी होणार असे चित्र निर्माण केले गेले. काही जण नगर दक्षिण भागात अतिक्रमण करुन ताबा घेण्याच्या प्रयत्नात होते. कार्यकर्त्यांवर दमदाटी करतील असे वाटत होते.
मात्र आता आम्ही आहोत, आता घाबरायची गरज नाही. आता या उत्तेरेतील अतिक्रमाला तेव्हढ्याच ताकदीने परत पाठवून देण्याची ताकद आपल्यात आहे.प्रास्ताविक मेळाव्याचे संयोजक सुमतीलाल कोठारी यांनी केले. मेळाव्यास पेमभाऊ बोथरा, ठाकूर नवलानी, अनिल पोखरणा, बाळासाहेब विधाते, लिंबाशेठ नागरगोजे, तुकाराम तावरे, श्याम मेघांणी, राजेंद्र बोथरा, राजेंद्र कटारिया, सतीश इंदाणी, गोपाल मनियार, आनंदराम मुनोत, संजीव गांधी, मोहन बरमेचा,राजेंद्र चोपडा, संजय चोपडा, संजय बोरा उपस्थित होते. मेळावा यशस्वीतेसाठी राजू शेटीया, संजय ताथेड, बाळू धाडिवाल, अजित गुगळे, राजकुमार ओसवाल, राजेंद्र कटारिया, पप्पू मुंदडा आदिंनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment