नगर । प्रतिनिधी -
येथील नगर रायझिंग ग्रुपच्या वतीने जागतिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित मिनी मॅरेथॉनमध्ये रन फॉर हेल्थचा संदेश देत नगरकर धावले. रविवारी सकाळी वाडियापार्क क्रीडा संकुल येथे इंडियन आर्मी सायकलिंगचे प्रशिक्षक सुभेदार सुमेरसिंग यांच्या हस्ते या स्पर्धेला प्रारंभ झाला. या मॅरेथॉनच्या माध्यमातून शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी व्यायामाचा संदेश देण्यात आला.
मॅरेथॉनमध्ये नगर-कल्याण रोडवरील पेट्रोल पंप ते पुन्हा वाडिया पार्क 5 असे कि.मी. चे अंतर स्पर्धकांनी पूर्ण केले. यावेळी रनर्ससाठी सेल्फी पॉईंट उभारुन संगीताच्या तालावर त्यांच्याकडून व्यायाम करुन घेण्यात आला. नगरकरांना सुदृढ आरोग्यासाठी व्यायामाचा संदेश देण्याकरिता दर महिन्याला एक मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन नगर रायझिंग ग्रप करणार असल्याची माहिती संदीप जोशी यांनी दिली. स्पर्धा यशस्वीतेसाठी नगर रायझिंगचे संदीप जोशी, जगदीप मक्कर, विद्या दाभाडे, अतुल डागा, योगेश चुत्तर, दिनेश भाटीया, अनुशा जोशी, प्रेरणा अडसुरे, प्रिया भागवत, महेश गोपाळकृष्णन, योगेश खरपुडे, गौतम जायभाय, दिनेश संकलेचा, दीपक कासवा, भरत चुडीवाला, दीपक पापडेजा, अमित अंदोत्रा, राहुल ओझा, बबलू भारतीय आदींनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment