नगर । प्रतिनिधी -
येथील प्रधान डाकघरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी स्नेहालयमधील साक्षी नरवडे, नीलेश वैरागर, शुभांगी भंडारे, प्रियांका कोबारणे, बिलाल सरदार या 6 मुलांना त्यांच्या आवश्यकतेनुसार पुस्तके, फुटबॉल, कपडे, गायन क्लाससाठी आवश्यक फी अशी मदत प्रवर डाकपाल एस. रामकृष्ण यांच्या हस्ते देण्यात आली.
यावेळी स्नेहालयचे संचेती, शबाना मॅडम, पोस्ट ऑफिसचे घुंगरकर, पंचारिया, जासूद, दहिवालकर, घोडके, सौ. गटणे, डेंगळे, सोनवणे, नरवडे, मडावी, दरंदले, जटाळे, जाधव, राहींज यांच्यासह मोठ्या संख्येने डाक कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष यादव यांनी केले, आभार प्रदीप सूर्यवंशी यांनी मानले.
No comments:
Post a Comment