नगर । प्रतिनिधी -
येथील श्री परशुराम प्रतिष्ठान च्या वतीने 3 मे ते 7 मे या कालावधीत भगवान श्री परशुराम जन्मोत्सव व अक्षय्य तृतीयेनिमित्ताने भव्य श्री परशुराम याग सावेडीतील श्री रेणुकामाता मंदिर सुयोग गृहनिर्माण सोसायटी, प्रोफेसर कॉलोनी चौक, सावेडी अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या पत्रिकेचे माळीवाडा येथील नगरचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात, पुजारी महंत संगमनाथ महाराज यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी परशुराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय देशपांडे, स्वप्नील देशमुख, सौ. मंजिरी देशपांडे, सौ.पद्मश्री देशपांडे,गजानन कुलकर्णी, सागर भोपे, गणेश भोपे, भार्गव देशपांडे, ढाकणे आदी उपस्थित होते.
शुक्रवार दि.3 मे रोजी सायंकाळी 6 वाजता श्री क्षेत्र माहूर येथील मातृज्योत व श्रीक्षेत्र जानापाव कुटी, मध्यप्रदेश येथील भगवान श्री परशुरामाच्या पादुका तसेच उत्सव मूर्तीचे आगमन व महाआरती होणार आहे.
शनिवार दि.4 मे रोजी सायंकाळी 5 वाजता भक्तीसंध्या कार्यक्रम होणार आहे. रविवार दिनांक 5 मे ते मंगळवार दिनांक 7 मे या कालावधीत दररोज सकाळी 6 वाजता भगवान श्री परशुराम याग होणार आहे. रविवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 9 वाजता रक्तदान शिबिर व सायंकाळी 5 वाजता रांगोळी स्पर्धा होणार आहेत. सोमवार दिनांक 6 मे रोजी सकाळी 9 वाजता चित्रकला स्पर्धा, सायंकाळी 5 वाजता कथाकथन व वक्तृत्व स्पर्धा होणार आहेत.
मंगळवार दिनांक 7 मे रोजी दुपारी 1 वाजता महाप्रसाद व सायंकाळी 5 वाजता रेणुका माता मंदिर ते भिस्तबाग चौक पाईपलाईन रोड येथे भगवान श्री परशुराम यांच्या पादुकांची भव्य शोभायात्रा होणार आहे. सायंकाळी 7 वाजता भागवताचार्य ह.भ.प. वा. ना. उत्पात (श्रीक्षेत्र पंढरपूर) यांचे व्याख्यान होणार आहे. रात्री 8 वाजता बक्षीस वितरण व 8.30 वाजता भगवान श्री परशुरामाची महाआरती होणार आहे.
खुल्या रांगोळी स्पर्धेसाठी साचेमुक्त रांगोळी, मुक्तहस्त, चित्र स्वरूप व ठिबक्यांची रांगोळी हा विषय ठेवण्यात आला आहे. पहिले ते चौथी या गटातील कथाकथन स्पर्धेसाठी भगवान श्री परशुराम हा विषय ठेवण्यात आला आहे. 5वी ते 7वी या गटातील विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धेसाठी अक्षय्यतृतीया, भारत माझा देश आहे. 8वी ते 10वी या गटासाठी पाणीटंचाई व उपाय योजना, व्यसन एक समस्या, माझ्या स्वप्नातील भारत.11 ते टी. वाय. या गटासाठी आधुनिक भारतातील युवकांपुढील आव्हाने, एकविसाव्या शतकातील भारतीय युवकांच्या जबाबदार्या हे विषय ठेवण्यात आले आहे. 5 ते 7 या गटातील चित्रकला स्पर्धेसाठी संकल्पचित्र, तर 8 वी ते 10 वी या गटासाठी स्मरणचित्र हे विषय ठेवण्यात आले आहेत.
सर्व स्पर्धा रेणुका माता मंदिर सुयोग गृहनिर्माण सोसायटी, प्रोफेसर चौक, सावेडी या ठिकाणी होणार आहेत. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्यांनी संयोजन समिती सदस्यांशी संपर्क साधावा असे आवाहन श्री परशुराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय देशपांडे व सदस्यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment