Thursday, 11 April 2019

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 14 रोजी ‘भीम पहाट’


नगर । प्रतिनिधी - येथील दि बुद्धिस्ट बहुउद्देशीय असोसिएशन व बौद्ध संस्कार संघाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी रविवार दि.14 एप्रिल रोजी पहाटे 5 वा. बुद्ध, भीमगीतांच्या बहारदार ‘भीम पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब देठे यांनी दिली.
रविवार दि. 14 रोजी पहाटे 5 वा. आम्रपाली गार्डन, गुलमोहोर रोड, सावेडी, नगर येथे होत असलेल्या कार्यक्रमात वामनदादा कर्नक यांचे शिष्य शाहीर दादू साळवे हे भीमजन्मावरील विशेष गीते गाणार आहेत. त्यांना वसंत उमाप, अनिता मेघडंबर, भीमराव साळवे हे सहगायक तर गुलाबराव नेटके (ढोलगी), शंकरराव गायकवाड (तबला), कुलदिप चव्हाण (बॅन्जो प्लेयर) साथसंगत करणार आहेत.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी इंजि. मंदा धनवे, प्रा. दिलीप गायकवाड, डॉ. प्रदीपकुमार चौदंते, एम. बी. साळवे व सदस्य प्रयत्नशील आहेत.
गेल्या 10 वर्षांपासून सुरु असलेल्या ‘भीम पहाट’ कार्यक्रमात पवन नाईक, सौरभ वखारे, गौरव सेन, गोरक्ष दुतारे, दिलीप शिंदे, नरेंद्र साळवे, राजू साळवे आदींनी सहभागी होऊन कार्यक्रमात रंगत आणलेली आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment