नगर । प्रतिनिधी -
येथील योगविद्या धामच्या वतीने शनिवार दि.13 रोजी सायंकाळी 6 वाजता योग विद्या गुरुकुल, नाशिकचे कुलगुरु डॉ.विश्वासराव मंडलिक यांचे ‘योग ः एक जीवन पध्दती’ या विषयावर व्याख्यान होणार आहे, अशी माहिती योगविद्या धामचे संचालक राजनकुमार यांनी दिली.
डॉ. विश्वासराव मंडलिक यांचे व्याख्यान भिस्तबाग चौकाजवळील ‘योग भवन’ येथे होणार आहे. सर्वांसाठी योगाभ्यास, आजारी व्यक्तींसाठी व वृध्दांसाठी योगाभ्यास आणि महिलांसाठी विशेष योगाभ्यास या विषयावर तसेच प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाभ्यास नियमित कशा पध्दतीने करावा या विषयी सविस्तर माहिती यावेळी देण्यात येणार आहे. योगाचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार होण्यासाठी योग विद्या धाम संस्थेतर्फे नगर शहरात व जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जातात. त्या अनुषंगाने डॉ. विश्वासराव मंडलिक यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. या व्याख्यानास जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित रहावे असे आवाहन योगविद्या धामचे अध्यक्ष डॉ. सुंदर गोरे व कार्याध्यक्ष जयंत वेसीकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment