नगर । प्रतिनिधी -
महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागरदेवळे येथे बुधवार दि.10 रोजी फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने मोफत नेत्रतपासणी व मोतिबिंदू, काचबिंदू, तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरदेवळे येथील संत सावता महाराज मंदिर येथे सकाळी 9 ते 3 या वेळेत हे शिबिर होणार आहे.
गरजू रुग्णांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी केले आहे. शिबिरात सर्व रुग्णांची मोफत नेत्रतपासणी करण्यात येऊन ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज भासेल अशा रुग्णांना पुणे येथे पाठविण्यात येणार आहे. तसेच रुग्णांची पुणे येथे जाणे, येणे, राहणे, जेवणाची मोफत व्यवस्था करण्याची आलेली आहे. तरी सर्व गरजू रुग्णांनी नांव नोंदणी व अधिक माहितीसाठी श्री. जालिंदर बोरुडे मो.नं. 9881810333 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment