नगर । प्रतिनिधी -
उपनगरातील सुखसागर कॉलनी, वाणीनगर, पाईपलाईन रोड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रमुख पाहुणे म्हणून ‘अहमदनगर घडामोडी’चे संपादक मनोज मोतीयानी, योगेश ठुबे, संकेत शिंगटे, संतोष वाणी, नितीन आव्हाड, शेखर तुंगार, संकेत शिंगटे आदी उपस्थित होते.
यानिमित्त सकाळी 11 वाजता बौद्धाचार्य सुरवसे यांनी बुद्धवंदना घेऊन कार्यक्रमाला सुरूवात केली. त्यानंतर दुपारी 12 वाजता स्नेहभोजन झाले. बाबासाहेबांच्या जीवनचरित्राबद्दल प्रबोधनही करण्यात आले.
प्रभाग एकमधील नगरसेविका दीपाली बारस्कर यांनी बाबासाहेबांचे देशाबाबतचे विचार सांगितले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड महेश देठे यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्व महापुरूषांची जयंती साजरी करण्याचा संकल्प यावेळी केला. यावेळी प्रतिष्ठानचे अनिल ठोकळ, प्रवीण सूर्यवंशी, सुनील मोकळ, उत्तम पवार, सोनवणे, विक्रम साठे, बोर्डे ताई, जाधव मॅडम इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment