नगर । प्रतिनिधी -
वर्ल्ड साळी फाउंडेशनच्या वतीने नगरमध्ये साळी समाजातील सर्व महिला, मुली व मुलांसाठी मोफत व्यावसायिक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या कॉम्प्युटर, शिवणकाम, ब्युटीपार्लर व फोटोग्राफीच्या मोफत व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन स्पार्कल इन्स्टिट्यूट, स्टेट बँकेच्या जवळ, दिल्लीगेट, अहमदनगर येथे राज्य स्वकुळसाळी समाज महिला मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. मृणाल कनोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुषमा साळी, मंगला मानकर, प्रशिक्षक सौ. अनुजा कांबळे, महेश कांबळे, सुनील साळी, सौ.सविता हावरे, महेश ढोरजे यांच्यासह फाउंडेशनचे संपर्क प्रमुख, प्रशिक्षणार्थी, समाजबांधव उपस्थित होते.
मृणाल कनोरे म्हणाल्या की, मोफत प्रशिक्षण देणे हे पुण्याचे काम आहे. पूर्वी गुरुकुल पद्धतीत मोफत प्रशिक्षण मिळत होते, आता सध्याचा जमान्यात मोफत देणे अवघड आहे तरी वर्ल्ड साळी फाउंडेशनने नोकरी न करता समाजातील युवक-युवतींनी स्वतःचा व्यवसाय करावा या हेतूने आयोजलेला उपक्रम कौतुकास्पद आहे.
या शिबिरात वय वर्षे 15 च्या वरील कोणीही समाजबांधव सहभागी होऊ शकतो. असे संपर्कप्रमुख महेश कांबळे यांनी सांगितले. प्रशिक्षण शिबिर पूर्ण करणार्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन, शासकीय/निमशासकीय स्तरावरील कर्ज योजना यांच्या माहितीद्वारे मदत करण्यात येईल.
तसेच असहाय, गरीब, गरजू महिला, मुली व मुलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment