नगर । प्रतिनिधी - अहमदनगर येथील आर्मी पब्लिक स्कूल येथे झालेल्या राज्यस्तरीय अलोहा अॅबॅकस स्पर्धेत कर्नल परब स्कूलची इ.2रीची विद्यार्थिनी अनुष्का काटे हिने लेव्हल 1-ग्रुप 1 मध्ये प्रथम क्रमांक मिळविला. अनुष्का ही अलोहा अॅबॅकस या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या नगरमधील आनंद अॅकेडमीच्या केंद्रात अॅबॅकसचे प्रशिक्षण घेत आहे. अनुष्काने नगरमध्ये झालेल्या राज्यस्तरीय अॅबॅकस स्पर्धेत 5 मिनिटात 70 पैकी 69 गणिते सोडवून प्रथम क्रमांक मिळविला.
अनुष्का ही जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका सौ.सीमा व अजयकुमार काटे यांची कन्या असून, तिने आतापर्यंत इंग्रजी व गणित ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक मिळविले आहे. तिला आई सौ.सीमा, आर्मी स्कूलच्या उपमुख्याध्यापिका सौ.संगीता काटे आणि आनंद अॅकेडमीच्या संचालिका सौ.सुरेखा लोढा यांचे मार्गदर्शन लाभले. या राज्यस्तरीय अॅबॅकस स्पर्धेत नासिक, पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, श्रीरामपूर आणि नगरमधील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यात सर्वात छोट्या अनुष्काने हे नेत्रदिपक यश मिळविले. छोट्या वयात इतके यश मिळविल्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment