नगर । प्रतिनिधी -
आनंदऋषीजी हॉस्पिटल हे मानवतेचे मंदिर आहे. ज्याप्रमाणे मंदिरात गेल्यानंतर भाविकाच्या सर्व इच्छाआकांक्षा पूर्ण होतात, त्याप्रमाणे या ठिकाणी येणारा प्रत्येक रुग्ण हा बराच होतो, असे प्रतिपादन साामाजिक कार्यकर्त्या सविताताई रमेश फिरोदिया यांनी केले.
आनंदऋषीजी हॉस्पिटल अॅकण्ड हार्ट सर्जरी सेंटरमध्ये राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी महाराजांच्या पुण्यस्मृतीदिनानिमित्त रमेश फिरोदिया एज्युकेशनल ट्रस्ट व सौ.सविताताई रमेशजी फिरोदिया आयोजित प्लॅस्टिक सर्जरी शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन सौ.सविताताई व रमेश फिरोदिया यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी शहर बँकेचे चेअरमन सुभाष गुंदेचा, संचालक अशोक कानडे, प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, किशोर संघवी (जळगांव), शिबिरातील तज्ज्ञ डॉ.नरेंद्र मरकड, डॉ.सौ.माया मरकड, संतोष बोथरा, सतीश लोढा, सुभाष मुनोत, वसंत चोपडा, डॉ.मनोहर पाटील, प्रकाश छल्लानी, कुंदन कांकरिया आदी उपस्थित होते.
याप्रसंगी सुभाष गुंंदेचा म्हणाले, पुणे, मुंबईसारखी रुग्णसेवा येथे मिळत आहे. तज्ज्ञ डॉक्टर अल्पदरात ही सेवा देत आहेत. खर्या अर्थाने आनंदऋषीजी हॉस्पिटल रुग्णांचे अश्रू पुसण्याचे काम करत आहे.
शिवाजी शिर्के म्हणाले, साामजिक बांधिलकीच्या माध्यमातून अत्याधुनिक मशिनरी व तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत कमी दरात रुग्णसेवा हे हॉस्पिटल देत आहे. याचे इतरांनीही अनुकरण करावे, जेणेकरुन जास्तीत जास्त रुग्णांना रुग्णसेवा मिळेल.
अशोक कानडे म्हणाले, प्रत्येक गोष्ट महाग होत आहे. त्यामुळे गरिबांना उपचार घेणे अवघड जात आहे. अशा मोफत शिबिराच्या माध्यमातून आनंदऋषीजी हॉस्पिटलने सातत्याने हे महान कार्य सुरु ठेवले आहे.
संतोष बोथरा म्हणाले, दि. 28 मार्चला हॉस्पिटलच्या चौथ्या व पाचव्या मजल्याचे उद्घाटन होत असून, या ठिकाणी 18 बेडचे हायटेक आयसीयू, स्पेशल रुम, जनरल वॉर्ड व डायलेसिससाठी विशेष विभाग केला आहे.
डॉ. नरेंद्र मरकड म्हणाले, जन्मजात व्यंग, मधुमेहामुळे होणार्या जुन्या जखमा, दुभंगलेले ओठ, तुटलेले कान, चेहर्यावरील व्रण आदींवर प्लॅस्टिक सर्जरी करता येते. यामुळे रुग्णातील आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. हॉस्पिटलच्या माध्यमातून कमी दरात हे उपचार होत असल्याने सर्वसामान्यांना परडत आहेत.
या शिबिरात डॉ.नरेंद्र मरकड, डॉ.सौ.माया मरकड आदींनी रुग्णांची तपासणी करुन मार्गदर्शन केले. शिबिरात 45 रुग्णांची तपासणी करण्यात आली. शेवटी प्रकाश छल्लानी यांनी आभार मानले.
दरम्यान, शुक्रवार दि.22 मार्च रोजी कान, नाक, घसा शिबिर होणार असून, यामध्ये डॉ. सुकेशिनी गाडेकर रुग्णांची तपासणी करुन मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती हॉस्पिटलच्या वतीने देण्यात आली.
No comments:
Post a Comment