Friday, 1 March 2019

मंगळवारी औद्योगिक सुरक्षा रॅली


नगर । प्रतिनिधी - 48 व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त कामगारांमध्ये सुरक्षा विषयक जागृती निर्माण होण्यासाठी मंगळवार दि.5 मार्च रोजी औद्योगिक सुरक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. औद्योगिक क्षेत्रात कार्यरत विविध कंपन्या, एमएआरजी संस्था, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते सकाळी 7:30 वा. एमआयडीसी पोलीस स्टेशन परिसरातून या रॅलीचे प्रारंभ होणार आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुरक्षा विषयक जागृती, अपघात विरहित कार्यस्थळ निर्मिती व शून्य अपघाताचे ध्येय गाठण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याचे पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. तर यावेळी एमएआरजी संस्थेच्या बोधचिन्हाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी एल अ‍ॅण्ड टीचे अरविंद पारगावकर, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक स्वप्नील देशमुख, अमोल कुलकर्णी, राधाकृष्ण पिल्ले, सुभाष तोडकर, सुभाष गांगुने, ज्ञानेश्वर डमाळे, मधुर बागायत, मिलिंद जोशी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment