नगर । प्रतिनिधी - आजपासून सुरु झालेल्या दहावी बोर्डाच्या परीक्षेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील रुपीबाई मोतीलालजी बोरा (न्यू इंग्लिश स्कूल) शाळेतील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देवून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी राष्ट्रवादीचे माजी शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष साहेबान जहागीरदार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर, रेखा जरे, सामाजिक न्याय विभागाच्या महिला अध्यक्षा साधना बोरुडे, रंजना उकिर्डे, मुसद्दीक मेमन, अन्सार सय्यद, अक्षय घोरपडे, गौरव विधाते, प्रितेश दरेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका कुसूम मावची, सचिन बर्डे, भाऊसाहेब पुंड, अमोल मेहेत्रे, सारिका गायकवाड. जोशी, सोमनाथ नजन, रोहित दहिफळे, विलास दांगट आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व शालेय शिक्षक उपस्थित होते.
प्रा.माणिक विधाते म्हणाले की, दहावी ही शैक्षणिक जीवनातील पहिली पायरी असून, त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. सर्व परीक्षांसारखे असतात. मात्र दहावी बोर्डाची परिक्षा महत्त्वाची असल्याने विद्यार्थ्यांच्या मनात मोठे दडपण असते. या दहावीच्या गुणांवर विद्यार्थ्यांचे पुढील भवितव्य अवलंबून असते. जीवनाला वळण देणारी ही परीक्षा तणावमुक्तीने हसत खेळत विद्यार्थ्यांना देता यावी, यासाठी आ.अरुणकाका जगताप व आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्याचा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
साहेबान जहागीरदार म्हणाले की, आजचे विद्यार्थी उद्याचे भविष्य आहे. त्यांच्या माध्यमातून भारताची विकासात्मक जडणघडण होणार आहे. तसेच राज्य सरकारने प्राथमिक शिक्षणानंतर विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात व्यावसायिक प्रशिक्षणाचा समावेश केल्यास भविष्यात युवक नोकरी मागे न लागता स्वत:चा व्यवसाय थाटून आपल्या पायावर उभे राहणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली.
No comments:
Post a Comment