Tuesday, 5 March 2019

‘साईसूर्य’कडून विवाह दृष्टीभेट योजनेत यावर्षी सुपर व्हिजनचा अनुभव


नगर । प्रिंतनिधी - दृष्टीदोषाचे प्रमाण मागील काही दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यामुळे चष्मा घालण्याचे प्रमाण वाढत आहे. टेलीव्हीजन, मोबाईल, व्हीडीओ गेम, संगणक, बारीक  प्रिंटची  पुस्तके यामुळे डोळ्यावर ताण पडून  अतिशय कमी वयात दृष्टीदोष निर्माण होतात. चष्मा तसा कोणालाच नकोसा असतो.  डोळ्यांवर साम्राज्य  करणारा  चष्मा हा  महिला व युवतींच्या  प्रगतीत अडसर ठरत आहे. विविध  क्षेत्रात त्यांना मिळणारी सुवर्णसंधी किंवा नोकरी क्षेत्रात मिळणारी  बढती  केवळ चष्मा  हिरावून नेत आहे. इतकेच नव्हे तर  विवाहयोग्य तरुणींना केवळ चष्मा असल्यामुळे चांगले स्थळ मिळणे दुरापास्त झाले आहे. म्हणूनच गत 33 वर्षे नेत्रसेवेत प्रगत असलेल्या डॉ.कांकरिया यांच्या अहमदनगर येथील साईसूर्य नेत्रसेवाने महिला व युवतींसाठी महिलादिनाचे औचित्य साधून चष्मामुक्ती अभियान करण्याचे ठरविले आहे. हा उपक्रम नगरसह पुणे येथे एशियन आय हॉस्पिटल मध्येही संपन्न होईल असे नेत्रतज्ञ डॉ. प्रकाश व डॉ. वर्धमान  कांकरिया  यांनी  सांगितले.
चष्मा कायमचा घालविण्यासाठी ः कॉन्ट्यूरा व्हिजन- चष्म्याचा नंबर व दृष्टीदोष घालविण्यासाठी दोन डझन पेक्षाही अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या  नेत्रशस्त्र क्रिया विकसित झाल्या असून एकाच छताखाली उपलब्ध असणार्‍या मोजक्या संस्थांमध्ये साईसूर्य नेत्रसेवा व एशियन आय हॉस्पिटल आहेत.
खास वैशिष्ट्ये - जी देऊ शकते 100% पेक्षा ही जास्त दृष्टी. यामध्ये नुसतीच चष्मा घालविण्याची क्षमता नाही तर चष्म्यापेक्षाही अधिक दृष्टीची. 
एकाच  छताखाली चष्म्याचा नंबर घालविण्यासाठी 16 प्रकारचे तंत्रज्ञान - 0.5 ते -40  पर्यंत  आणि + 18 पर्यंत कोणताही  नंबर घालवा. कॉन्ट्यूरा या लेसर  पध्दतीने बदल घडवून आणला  असून आता दृष्टीबिंदू केंद्रीत  उपचार  करता  येतात. ही  पध्दत  सर्वात  चांगली  पध्दत  समजली जाते.  बुब्बुळाच्या  काही  अनियमितता कॉन्ट्यूराने  उपचार  होत  असल्यामुळे रुग्णांचा  नुसताच  चष्मा  जात  नाही  तर  चष्म्यापेक्षाही  अधिक  विनाचष्मा  दिसू  लागते.  नेत्रसेवेत  अतिअद्ययावत  असलेल्या  कान्ट्यूरा  व्हिजन  या  अद्ययावत  तंत्रज्ञानाने पूर्ण  असलेल्या  मशिनरीने  दृष्टीदोष  व  चष्मा  कायमचा  घालविण्यासाठी  या शिबिराचा  लाभ  होईल  असे संचालकांनी  सांगितले.
 पुणे  येथील  नेत्रशिबिर - पुणे  येथील  एशियन आय हॉस्पिटल येथे  दि. 9  व  10  मार्च असे  सलग 2 दिवस लॅसिक लेसर शिबिर आयोजित करण्यात आले असून नेत्रतज्ञ डॉ. वर्धमान व डॉ. सौ. श्रुतिका आणि त्यांचे विशेष  सहकारी नेत्ररुग्णांची तपासणी व शस्त्रक्रिया करणार आहेत. पुणे येथे दि. 7  मार्च  पर्यंत नांवनोंदणी करता येईल तसेच पुणे परिसरातील रुग्णांनी एशियन आय हॉस्पिटल दूरध्वनी क्र. (020) 26162424 किंवा मोबाईल क्र. 7066 42 4699 यावर संपर्क साधावा
अहमदनगर  नेत्रशिबिर - अहमदनगर येथील साईसूर्य नेत्रसेवा येथे 16 व 17 मार्च रोजी सकाळी 9 ते दु.2 पर्यंत लेसर शिबिर आयोजित केले आहे. 16 मार्च रोजी स.9 ते दु.2 पर्यंत नेत्ररुग्णांच्या डोळ्यांची संगणकीय तपासणी मोफत होईल व 17 मार्च रोजी व्हीजन परफेक्ट या जगातील अत्याधुनिक लॅसिक लेसर उपचार पध्दतीने आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नेत्रतज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया व टीम उपचार करतील. चष्म्याच्या  नंबर  घालविण्याचा  प्रचलित  लॅसिक  व  नवीन  स्माईल यापेक्षाही कॉन्ट्यूरा  अधिक  अचूक  व परिणामकारक  आहे. सदर शिबिरात महिला रुग्णांना जास्तीत जास्त सवलत मिळणार असून याही वर्षी मोठा प्रतिसाद मिळेल असा विश्वास डॉ. कांकरिया यांनी  व्यक्त  केला. शिबिरात सहभागी  होणार्‍या रुग्णांनी आपल्या पूर्वनोंदणीकरिता अहमदनगर येथे दूरध्वनी क्र. 0241-2346317 किंवा  मोबाईल   क्र. 8888982222, 9112288611  यावर  संपर्क  साधावा. ऑपरेशन खर्चात 50% सवलत, त्यानंतरचा काळा चष्मा, औषधे मोफत देण्यात येईल. तरी ह्या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी  लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासकीय अधिकारी आर. टी. केदार व श्री. देवदत्त यांनी  केले  आहे.

No comments:

Post a Comment