Friday, 22 March 2019

‘सण-उत्सवाच्या काळात समाजहिताचे उपक्रम राबवावे’


नगर । प्रतिनिधी - बदलत्या जीवनशैलीमुळे मनुष्य विविध व्याधींनी त्रस्त आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दैनंदिनीत आजार, विहाराबरोबरच नियमित व्यायाम केला पाहिजे. तेव्हाच आपले आरोग्य निरोगी राहू शकते. त्याचबरोबर नियमित आरोग्य तपासणी करुन घेतली पाहिजे. सण-उत्सव काळात यंग पार्टी, मंडळे, प्रतिष्ठानने असे समाज हिताचे उपक्रम राबविले पाहिजे, त्यातून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते शेख हाफिज मोहंमद उमर यांनी केले. 
हजरत अली (रजि.) यांच्या जयंतीनिमित्त तख्ती दरवाजा यंग पार्टी, या अली यंग पार्टी, आरोग्य मित्र संघटना व के.के.आय. बुधराणी हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे तख्ती दरवाजा मशीद चौकात आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सुफी मुन्नवरशाह कादरी, मौलाना हाफिज जुबेर, राजूभाई शेख, शेख हाफिज मोहंमद उमर, मुश्ताक सर, मोहंमद हुसेन, डॉ.जुनेद शेख, शफाकत सय्यद, अमीर सय्यद, जावेद तांबोळी, शेख इसहाक, आबीद हुसेन, शेख कासीम, इम्रान खान, मतिन सय्यद, साजिद सय्यद, फैरोज खान, जावेद मास्टर आदी उपस्थित होते.
 सूत्रसंचालन मुश्ताक सर यांनी केले. आभार मोहंमद हुसेन यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तख्ती दरवाजा यंग पार्टी व या अली यंग पार्टीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. शिबिरात तन्वीर चष्मावाला, डॉ.माया आल्हाट, डॉ.संभाजी भोर, डॉ.संजय शिंदे, डॉ.सतीश परमार आदींनी  122 रुग्णांची तपासणी केली. यातील 15 रुग्णांना पुणे येथे शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात आले.

No comments:

Post a Comment