Friday, 22 March 2019

बडीसाजन ओसवाल श्रीसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत


नगर । प्रतिनिधी - बडीसाजन ओसवाल श्रीसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात  पार पडली. अरणगाव रस्त्यावर प्रगतिपथावर असलेल्या समाजाच्या नूतन वास्तूमध्ये ही सभा झाली. 
कार्यक्रमाच्या सुरवातीला पुलवामा हल्ल्यातील हुतात्मा जवानांना, तसेच समाजातील मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. सेक्रेटरी विशाल शेटिया यांनी सर्वांचे स्वागत केले व मागील वर्षभराचा वृत्तांत समाजासमोर मांडला. त्यास सर्वांनी एकमताने मंजुरी दिली. मागील वर्षी समाजाने केलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. सभेसाठी उपाध्यक्ष रतीलाल कटारीया, सेक्रेटरी विशाल शेटिया, दीपक बोथरा, मिलिंद जांगडा, तसेच कार्यकारिणी सदस्य राजेंद्र बोथरा, धरमचंद कोठारी, सुंदरलाल भंडारी, महेंद्र लोढा, अजित कर्नावट, अनिल लुंकड, नरेंद्र चोरडिया, दिनेश शिंगवी, सुर्यकांत धोका, सुमतीलाल कोठारी, सल्लागार सदस्य अनिल कोठारी, धनराज खाबिया, मोहन बरमेचा, रमेश बाफना, शिरीष बोरा, शांतीलाल संकलेचा उपस्थित होते. या सर्वांनी समाजाच्या पुढील विविध कार्यांसाठी उपयुक्त अशा सूचना केल्या.
 अध्यक्ष विलास लोढा यांनी सुरुवातीला अरणगांव रस्त्यावरील श्री बडीसाजन श्रीसंघाच्या सुरु असलेल्या नूतन वास्तूत सभा आयोजित करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. समाजातील अनेक दानशूर योगदात्यांच्या योगदानातूनच अतिशय अद्यायावत, भव्य, सुंदर अशा वास्तूची निर्मिती होत असून तेथे 70 खोल्या असतील, उपयुक्त असे मंगल कार्यालय व मागील बाजूस लॉनचे काम सुरु असून एका वर्षांत ही वास्तू लोकार्पण करण्यासाठी सर्व संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. संपूर्ण भारतात समाजाचे असे मंगल कार्यालय नसेल याचा आम्हाला अभिमान वाटत असल्याचेही लोढा म्हणाले. सभासदांच्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली.
श्री. लोढा पुढे म्हणाले की, माझी प्रकृती बरी नसते. परंतु समाजाच्या उत्कर्षाच्या कामात माझे मन रमते व त्यामुळे असलेल्या दुखण्याचा देखील विसर पडतो. या पुढचे संपूर्ण आयुष्य मी समाज्याच्या प्रगतीसाठी देणार असून त्यासाठी समाजाने दिलेल्या सहकार्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. 
ही नूतन वास्तू आर्किटेक्ट श्री. मयुर कोठारी व एस.एस. गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतिपथावर आहे. आपला समाज हा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहे. यापुढे आपल्याला समाजातील उपेक्षित व गरजूंसाठी घरकुल उभारण्याची सर्व संचालक मंडळाची योजना असून उद्योजक श्री. पेमराज बोथरा, धनराज संचेती व लालजी ट्रस्ट यांचे यासाठी मोठे सहकार्य लाभत आहे असे सांगून सर्वांचे आभार मानले.
या सभेमध्ये सर्वश्री. संजय छाजेड, राजेश कोठारी, संजय गुगळे, सीए किरण भंडारी, प्रकाश जैन, वसंत लोढा, मिलींद जांगडा, पेमराज बोथरा, सुभाष कर्नावट यांनी सूचना मांडल्या. श्री बडीसाजन ओसवाल श्री संघाचे आनंद हॉस्पिटलजवळील मंगल कार्यालय देखील अद्ययावत करण्यात आले आहे, अशी माहिती विशाल शेटिया यांनी दिली. उपाध्यक्ष सूर्यकांत धोका यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment