Wednesday, 6 March 2019

कथ्थक नृत्य परीक्षेत ’नृत्यझंकार’ नृत्यवर्गाचे नेत्रदीपक यश


नगर । प्रतिनिधी - अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयामार्फत होणार्‍या कथ्थक नृत्याच्या परीक्षेत नगर येथील ‘नृत्यझंकार’च्या नृत्यवर्गाने नेत्रदीपक यश संपादन केले. नृत्यवर्गाच्या 28 मुलींनी विशेष प्राविण्य मिळविले व सर्व मुली प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या.
नगर केंद्रात विशेष स्थान पटकावलेल्या विद्यार्थिनी - प्रारंभिक (प्रथम वर्ष) - राजश्री भणगे (प्रथम), साक्षी बारहाते व पूर्वा  देसले (द्वितीय), तनुश्री डोके (तृतीय). प्रवेशिका प्रथम (द्वितीय वर्ष)  - ऋतुजा दराडे (प्रथम), आंचल सोनी व रिया येवलेकर (द्वितीय), प्रांजल चांदगुडे (तृतीय).
मध्यमा प्रथम (चतुर्थ वर्ष) - श्रद्धा फाटक व वृषाली पंधारे (प्रथम), श्रिया पटवा (द्वितीय), शुभदा कराळे (तृतीय). सर्व मुलींना ‘नृत्यझंकार’च्या संचालिका प्रिया ओगले-जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment