Wednesday, 6 March 2019

अयोध्यानगरीत महाशिवरात्रीनिमित्त शिवमहापुराण कथेची सांगता


नगर । प्रतिनिधी - तुम्हाला जर खरच मोठे व्हायचे असेल तर लोक काय म्हणतील याकडे दुर्लक्ष करा. ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’. तुम्ही किती चांगले वागा तरी लोक नाव ठेवल्याशिवाय राहत नाहीत. ही परंपरा काय आत्ताची नाही तर पुराणकाळापासून सुरु होती आणि आजही आहे. देव-देवतांना वाईट म्हणणारे, नावे ठेवणारे तेव्हा होते, आजही आहेत. तेव्हा तुम्ही लोक चांगले म्हटले तरी हुरळून जाऊ नका आणि नावे ठेवली तरी वाईट वाटून घेऊ  नका, असे प्रतिपादन ह.भ.प.गणेश महाराज कुदळे यांनी  केले.
पाईपलाइन रोडवरील श्रीराम चौकात अयोध्यानगरीत महादेव प्रतिष्ठानच्यावतीने महाशिवरात्रीनिमित्त शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. या कथेची सांगता काल्याचे कीर्तन, महाप्रसादाने मोठया उत्साहात झाली. यावेळी किर्तनातून सामाजिक संदेश देतांना ते बोलत होते. याप्रसंगी आ.संग्राम जगताप, नगसेवक विनित पाउलबुधे, सुनील त्र्यंबके, संपत बारस्कर, बाळासाहेब बारस्कर, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, संतोष गाडे, सचिन सप्रे, कृष्णा लांडे, अजय पवार आदी उपस्थित होते. 
ह.भ.प.कुदळे महाराजांनी यावेळी सांगितले की, कुणाचे वाईट करु नका, वाईट चिंतू नका, आई-वडिलांची सेवा करा त्यांचा सांभाळ करा, स्त्री भु्रण हत्या करु नका, आपल्या रोजच्या जेवणात पवित्र अन्न ग्रहण करा. अंतःकरण शुद्ध ठेवा, आयुष्यात तुम्हाला काही कमी पडणार नाही, असे सांगितले. 
गेले  सात दिवस शिवमहारापुण कथेत शिवलीलांचे वर्णन केले. शिवजी भक्तांच्या मागे पुढे उभे राहून सांभाळ करताना त्यातूनच 12 ज्योर्तिलिंगाची निर्मिती कशी झाली याचे विवेचन त्यांनी केले. श्रीकृष्णाच्या बाललीलांचे वर्णन आपल्या विनोदी शैलीने केले. सप्ताह सांगता प्रसंगी महादेव प्रतिष्ठानच्या मंदिरातील पुजारी प्रकाश लंके देवा यांचा अपघात झाल्याने समाजसेवेचे ऋण म्हणून घेऊन त्यांनी वैद्यकीय उपचारसाठी 11 हजारांचा धनादेश दिला. या प्रतिष्ठानच्या कार्याची ह.भ.प.कुदळे यांनी कौतुक केले.
सात दिवस सप्ताहात विविध मान्यवर व्यक्ती आरतीसाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे 7 दिवस सूत्रसंचालन दिनकरराव थोरात यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे राजाराम चव्हाण, शिवाजी लगड, दादा भोईटे, शंतनू पांडव, दिनेश कुलकर्णी, रमेश संत, कैलास शेळके, बाबा रासकर, राजू काकणे, मच्छिंद्र लांडगे, सपकाळ, महामुनी, बुरगुल, तेलोरेे आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment