नगर । प्रतिनिधी - येथील मानकन्हैय्या ट्रस्ट, साईसूर्य नेत्रसेवातर्फे महिला दिनाचे औचित्य साधून कॉन्टूरा लेसर उपचाराने चष्म्याचा नंबर घालविण्याच्या हेतूने ‘विवाह दृष्टीभेट’ नेत्रशिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात वीरमातांचा व महिला पत्रकारांचा सत्कार करण्यात आला, अशी माहिती संयोजिका डॉ. सुधा कांकरिया यांनी दिली.
सुरूवातीस शहीद जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. वीरमाता श्रीमती दगडाबाई तुकाराम वामन, श्रीमती पारूबाई अंबादास शिंदे यांचा सन्मान साडीचोळी, धनादेश, भेटवस्तू, मानपत्र देऊन करण्यात आला.
वीरमातांच्या हस्ते दीपप्रज्वलनाद्वारे नेत्रशिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आशाताई फिरोदिया, मीनाताई मुनोत, डॉ. सुधा व डॉ. प्रकाश कांकरिया उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छायाताई फिरोदिया होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. सुधा कांकरिया यांनी केले. डॉ. प्रकाश कांकरिया यांनी चष्मा घालविण्याचे तंत्रज्ञान, अत्याधुनिक लेसर प्रणाली कॉन्टूरा या उपचार पध्दतीविषयी उपस्थितांना माहिती दिली.
याप्रसंगी महिला पत्रकार मीनाताई मुनोत, शिल्पा रसाळ, कीर्ती खेडकर, पूजा गुंदेचा, प्रियंका चिखले, प्रियंका पुंड, नूतन शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. श्रीमती मीनाताई मुनोत, आशाताई फिरोदिया, पूजा गुंदेचा, शिल्पा रसाळ यांनीही मनोगत व्यक्त केले.
शिबिरासाठी डॉ. प्रकाश कांकरिया डॉ. वर्धमान कांकरिया यांच्यासह डॉ. अनिल सिंग, डॉ. राजपाल उसनळे, डॉ. स्मिता पटारे, डॉ. अजिता गरूड, डॉ. स्वप्नील राठोड यांनी परिश्रम घेतले. सुरेश क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले.
No comments:
Post a Comment