नगर । प्रतिनिधी - कापूरवाडी (ता. नगर) येथे कानिफनाथ यात्रेनिमित्त अशा जंगी हगाम्याचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस ही यात्रा भरते. शनिवार, दि. 16 रोजी सकाळी कानिफनाथांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. दुपारी महाआरती करण्यात आली. गावातील ग्रामस्थांनी 12 वाजता 9 दिवसांचा उपवास मंदिरामध्ये सोडला. संध्याकाळी करमणुकीसाठी लोकनाट्य तमाशा झाला. तसेच छबिनाही काढण्यात आला.
रविवारी यात्रा कमिटीच्या वतीने भव्य हगाम्याचे आयोजन करण्यात आले होते. या हगाम्यात नामवंत पहिलवानांनी हजेरी लावली. काही कुस्त्या पापणी बंद होण्याच्या आत निकाली निघाल्या. मल्लानीं डावपेच टाकत प्रेक्षकांची मने जिंकली.
चांगल्या कुस्त्यांसाठी प्रेक्षकामधून बक्षिसे लावण्यात येत होती. शंभर रुपयांपासून एकवीस हजार रुपयांपर्यंत कुस्त्या लावण्यात आल्या. यावेळी अक्षय कर्डिले, सरपंच संभाजी भगत, उपसरपंच मारुती कचरे, शिवाजी दुसुंगे, राजू भगत, धनंजय खर्से, बाजार समिती संचालक जगन्नाथ मगर, कानिफनाथ कासार, वसंत आगरकर, प्रशांत दुसुंगे, सचिन तोडमल, जावेद शेख, अशोक भगत, दिलीप भालसिंग, बाबासाहेब खर्से, बन्सी कराळे उपस्थित होते.
पंच म्हणून मुन्ना शेख, रावसाहेब कराळे, माणिक धनगर, साहेबराव दुसुंगे, गणेश भगत, जावेद शेख, शिवाजी दुसुगे यांनी काम पाहिले.
या हगाम्यात मोठ्या संख्येने मल्ल सहभागी झाले होते.हगाम्याचे सूत्रसंचालन सरपंच संभाजी भगत, कानिफनाथ कासार यांनी केले.
No comments:
Post a Comment