Tuesday, 5 March 2019

मनपाचे बजेट गुरुवारी स्थायीत


नगर । प्रतिनिधी - महानगरपालिकेकडून सन 2019-2020 चे वार्षिक बजेट प्रशासनाकडून अंतिम झालेले होते. स्थायी समितीच्या सभापती निवडीचा अवधी बाकी होता. काल स्थायीची निवड झाली असून सभापती पदी मुदस्सर शेख यांची निवड झाली. आता येत्या गुरूवारी 7 मार्च रोजी स्थायी समितीमध्ये आयुक्तांकडून हे बजेट सादर केले जाणार आहे. त्यासाठी सभापती मुदस्सर शेख यांनी तात्काळ सभेचे आयोजन केले आहे. 
दरम्यान, मनपाच्या बजेटसाठी उशीर झाला असल्याने मनपाचे आर्थिक नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. स्थायीच्या निवडी होत नसल्याने बजेट सादर करता येत नव्हते. काल सोमवारी स्थायीची निवड प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये बसपाचे नगरसेवक मुदस्सर शेख सभापती झाले. तर महिला बाल कल्याण समितीच्या सभापती पदी लताताई शेळके यांची तर उपसभापती पदी सुवर्णा गेनप्पा यांची निवड झाली. आज मुदस्सर शेख यांनी तातडीने बजेट सादर होण्यासाठी नियोजन केल्याचे बोलले जात आहे.

No comments:

Post a Comment