Tuesday, 5 March 2019

रिमांड होममधील विद्यार्थ्यांची दप्तराच्या ओझ्यातून मुक्तता


नगर । प्रतिनिधी - येथील सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनच्या महिला सदस्यांनी रिमांडहोम येथील लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालयास 5 कपाटांची भेट देऊन विद्यार्थ्यांसाठी दप्तरमुक्तीचा उपक्रम राबविला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दप्तराच्या ओझ्यातून मुक्ती मिळणार आहे. तर त्यांचे शैक्षणिक साहित्यांना सुरक्षित जागा मिळाली आहे.
 कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुण्या प्रतिभा धूत व सुशीला मोडक यांच्या हस्ते शाळेस कपाटांची भेट देण्यात आली. यावेळी प्रकल्प प्रमुख सविता चड्डा, डॉली मेहेता, रिटा सलुजा, संगीता ओबेरॉय, राज चौधरी, सुमन कपूर, मीना सूद, प्रिटी धुप्पड, सुनीता बक्षी, शिल्पा गांधी, मीनू चड्डा, किट्टी मल्होत्रा, डॉली भाटिया, कैलाश मेहेता, मीना हरवानी आदींसह सेवाप्रीतच्या सदस्या उपस्थित होत्या.
 प्रास्ताविकात सेवाप्रीतच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय यांनी उपक्रमाचा हेतू सांगितला. सविता चड्डा यांनी रिमांड होममध्ये वंचित घटकातील विद्यार्थी शिक्षण घेत आहे. त्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी व त्यांच्या शैक्षणिक साहित्यांना सुरक्षित जागा उपलब्ध करुन देण्यासाठी सेवाप्रीतने हा उपक्रम राबविल्याचे सांगितले.
प्रतिभा धूत म्हणाल्या की, वंचित घटाकातील विद्यार्थी हे आपल्या समाजाचेच एक घटक आहे. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
सुशीला मोडक यांनी सेवाप्रीतच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच यावेळी डॉ.वैशाली किरण दिपक यांनी विद्यार्थ्यांची हिमोग्लोबीन व रक्तगटाची मोफत तपासणी करुन, विद्यार्थ्यांना उत्तम आरोग्यासाठी आहार व व्यायामविषयी मार्गदर्शन केले. शिक्षक वाघुलकर यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करुन कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments:

Post a Comment