नगर । प्रतिनिधी - नोकरीनिमित्ताने व शिक्षणासाठी परगावी राहणार्यांसाठी उत्तम जेवण मिळणे महत्वाचे आहे. निरोगी जीवनासाठी आहार उत्तम असणे आवश्यक आहे. जीवनसत्व असलेले गुणवत्ता, दर्जा असलेले घरगुती पद्धतीचे जेवण माय टिफिनने उपलब्ध केले आहे. माय टिफीनमार्फत रेल्वे पार्सल, घरपोहोच डबा, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सेवा उपलब्ध आहे. तसेच प्रोफेसर कॉलनी येथे नगरकरांच्या आग्रहास्तव माय टिफीनच्या तिसर्या शाखेचा शुभारंभ करण्यात आला आहे,असे प्रतिपादन माय टिफीनचे संचालक हेमंत लोहगावकर यांनी केले.
प्रोफेसर कॉलनी येथे महाराष्ट्रात प्रथम आयएसओ प्रमाणित माय टिफीनच्या तिसर्या शाखेचा शुभारंभ करण्यात आला.
या शाखेचे उ्दघाटन माय टिफीनचे संचालक हेमंत लोहगावकर यांच्या मातोश्री श्रीमती कुसुम लोहगावकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी श्रीमती ऊर्मिला नाईक, निखिल कुलकर्णी, विवेक सरनाईक, मिलिंद कुलकर्णी, सतीश लोहगावकर, माणिक दारवक, नितीन लोहगावकर, बन्सीमहाराज मिठाईवाले, नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment