Tuesday, 5 March 2019

श्री आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या मोफत शिबिरास प्रारंभ


नगर । प्रतिनिधी - जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आनंदऋषीजी महाराजांच्या सत्ताविसाव्या पुण्यस्मृती दिनाचे औचित्य साधून विविध मोफत आरोग्य शिबिरांचा शुभारंभ  शिवसेना उपनेते अनिल राठोड  यांच्या हस्ते काल (सोमवार) दीप प्रजवलनाने करण्यात आला .
अस्थिरोग तपासणी व सांधे बदली शिबिरासाठी स्वर्गीय छाया अमृत गांधी यांच्या स्मरणार्थ अमृत अभय गांधी व परिवाराने योगदान दिले. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अभय गांधी, डॉ. अभय भंडारी, डॉ. सोनाली भंडारी, कुंतीलाल गांधी, राजेंद्र कटारिया, विजय कटारिया, सौ.वंदना गांधी, चि. प्रणव, अनुष्का व आशय गांधी, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अनिल शिंदे, नगरसेवक दत्ता कावरे, नगरसेवक अप्पा नळकांडे, डॉ. प्रकाश कांकरिया, सतीश लोढा, संतोष बोथरा, डॉ. आशिष भंडारी, वसंत चोपडा आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरवातीला जैन सोशल फेडरेशनच्या वतीने संतोष बोथरा यांनी सर्वांचे स्वागत करून हॉस्पिटलच्या कार्याविषयी माहिती दिली. मोफत शिबिरांचा आजपर्यंत हजारो गरजू रुग्णांनी लाभ घेतला आहे. अशा शिबिरांसाठी अनेक दानशूर आम्हास मिळत आहेत याबद्दल त्यांनी आभार मानले. 
अनिल राठोड म्हणाले की, या हॉस्पिटलमधील रुग्णसेवेचे कार्य बहरत असून ही शिबिरे म्हणजे रुग्णसेवेचा यज्ञ  आहे.संपूर्ण भारतातून या हॉस्पिटलच्या चांगल्या कामाची प्रचिती मिळत असून माफक दरात अत्याधुनिक चांगली रुग्णसेवा देणारे हे हॉस्पिटल गरजू, गरीब रुग्णांसाठी मंदिरासमान आहे 
शिबिरामध्ये डॉ. अखिल धानोरकर व डॉ. नितीन वर्पे यांनी रुग्णांची तपासणी केली. 288 रुग्णांनी या शिबिराचा  लाभ घेतला. माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी महाशिवरात्रीच्या पवित्र शुभ दिनी अशा मोफत शिबिराचा प्रारंभ आपण करीत आहात ही बाब उल्लेखनीय असून आपले रुग्ण सेवेचे कार्य बहरत जावो अशी आशा व्यक्त केली.
सौ. वंदना गांधी यांनी  आयोजक परिवाराच्या वतीने मनोगत व्यक्त करून आईच्या इच्छेनुसार आज आम्हाला मिळालेली रुग्णसेवेची  संधी ही आमच्या दृष्टीकोनातून भाग्याची गोष्ट असल्याची भावना व्यक्त केली.
डॉ. नितीन वर्पे यांनी उपस्थित  रुग्णांना मार्गदर्शन केले. योगदाते गांधी व कटारिया परिवाराचा अनिल राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रकाश छल्लाणी यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय वरकड यांनी केले.
दरम्यान, दि. सात मार्च रोजी हार्निया, हैड्रोसिल व इतर  जनरल   शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असून गरजूंनी   लाभ घ्यावा असे आवाहन जैन सोशल फेडरेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment