नगर । प्रतिनिधी - भगवान महावीरांनी आपल्या संदेशातून अनेक विविध विधान शिकवले आहेत. त्यातूनच निरोगी जीवनाचा संदेश दिला आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटल हे निरोगी जीवन जगण्यासाठीच सुरु झाले आहे. दिवसेंदिवस महाग होत चाललेली आरोग्य सेवा आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये अत्यल्प दरात होत असल्याने रुग्णांना याचा मोठा फायदा होत आहे. हॉस्पिटलमध्ये सर्व डॉक्टर्स माणुसकीच्या भावनेतून काम करत आहेत. सहज पेलतील, असे उपचार येथे होत असल्याने सर्व रुग्ण समाधान व्यक्त करत येथून जातात. आज अनेक ठिकाणी आरोग्य शिबिरे हे फक्त नावालाच घेतली जातात. परंतु आनंदऋषीजी हॉस्पिटल हे खर्या अर्थाने सेवाभावनेने काम करत आहे, असे प्रतिपादन सी.ए. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. परेश बोरा यांनी केले.
आनंदऋषीजी हॉस्पिटल अॅण्ड हार्ट सर्जरी सेंटरमध्ये राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराजांच्या पुण्यस्मृतीदिनानिमित्त स्व.सुशीलाबाई लखमीचंदजी बोथरा यांच्या स्मरणार्थ बोथरा परिवार आयोजित दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन सी.ए.असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.परेश बोरा व बडीसाजन ओसवाल क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष सुशील भंडारी यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी आयोजक सतीश बोथरा, अजित बोथरा, अपर्णा बोथरा, प्रतिभा बोथरा, बडीसाजन क्रेडिट सोसायटीचे संचालक सचिन कटारिया, दीपक बोथरा, संतोष सुंदेचा, राखी सुंदेचा, गणेश कांकरिया, प्रितम राका, डॉ.मनोहर पाटील, संतोष बोथरा, डॉ.प्रकाश कांकरिया, कुंदन कांकरिया, सतीश लोढा, डॉ.सतीश राजूरकर, डॉ.अभिजित भातकुलकर, डॉ.सौ.निलोफर धानोरकर, डॉ.रवींद्र मुथ्था, प्रकाश छल्लानी आदी उपस्थित होते.
संतोष बोथरा म्हणाले, आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या मोफत आरोग्य शिबिरामध्ये दरवर्षी काहीतरी नावीन्य असावे यासाठी प्रयत्न असतो. गरजूंना येथे अत्यल्प दरात शस्त्रक्रिया होणार आहेत. वाढत्या आजारांचे निदान होण्यासाठी दरवर्षी अत्याधुनिक मशिनरी उपलब्ध करुन अत्यल्प दरात रुग्णांना सेवा देत आहे. त्यामुळे हॉस्पिटलचा विश्वासार्हतेत वाढ होत आहे. लवकरच या ठिकाणी 52 बेडचा अत्याधुनिक आय.सी.यू. विभाग सुरु करण्यात येणार आहे. पुढील वर्षात रुग्णांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला.
प्रास्ताविकात डॉ.प्रकाश कांकरिया म्हणाले की, आनंदऋषीजी हॉस्पिटलमधून निघालेली ही सेवेची गंगा अविरत वाहत जात आहे. सुसज्ज हॉस्पिटल, ब्लड बँक, अत्याधुनिक नेत्रालय मानवसेवेसाठी उभारले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील एन.ए.बी.एच. मान्यता असलेल्या या हॉस्पिटलमध्ये गोरगरिबांचे समाधान व्हावे, असेच काम होत आहे. आजच्या शिबिरांतर्गत गरोदर महिलांसाठी मेडिटेशनचे धडे डॉ.सुधा कांकरिया या देणार आहेत.
सचिन कटारिया म्हणाले, हॉस्पिटलचे सुरु असलेले हे अत्याधुनिक आरोग्य सेवेचे अविरत सुरु असलेले कार्य असेच सुरु राहो. त्यासाठी आम्हीही यात खारीचा वाटा उचलत आहे. डॉ.सतीश राजुरकर म्हणाले, नवनवीन तंत्रज्ञान व आधुनिक उपचार पद्धतीच्या माध्यमातून रुग्णांना कमी वेदना व सुलभ उपचार कसे मिळतील यासाठी रुग्णालय विशेष परिश्रम घेत आहे. दि. 18 मार्च ते 18 जूनपर्यंत हे शिबिर सुरु राहणार असून, यामध्ये लॅप्रोस्कोपीद्वारे हार्निया, पित्ताशय, गर्भाशय, व्यंधत्व, अॅपेडिंक्स शस्त्रक्रिया आदींविषयी माहिती दिली.
डॉ.अभिजित भातकुलकर, डॉ.सतीश राजूकर, डॉ.सौ.निलोफर धानोरकर, डॉ.रवीद्र मुथा यांनी या शिबीरात 156 रुग्णांची तपासणी करुन मार्गदर्शन केले.
प्रकाश छल्लानी यांनी आभार मानले. मंगळवार दि. 19 मार्च रोजी स्त्री रोग तपासणी शिबिर होणार आहे.
No comments:
Post a Comment