नगर । प्रतिनिधी - झेंडीगेट येथील जागृत दक्षिणमुखी हनुमान मंदिरात सालाबादप्रमाणे महाशिवरात्री निमित्ताने सोमवारी (दि.4) सकाळी 9.30 वा. आरती व शिवप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी शिवआराधना करण्यात आली. अ.नगर मर्चंट बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक मोहन बरमेचा, विजय मर्दा यांच्या हस्ते महादेवाची व हनुमंताची आरती करण्यात आली. यानंतर खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी साईनाथ कावट, देवस्थान भक्त मंडळाचे सदस्य, भाविक उपस्थित होते.
देवस्थानचे प्रमुख रामदास कावट, किसन कावट यांनी उपस्थितांना उत्सवाची माहिती दिली व आभार मानले. यानिमित्त मंदिर व गाभार्यात सुशोभीकरण करण्यात आले होते. महाशिवरात्रीपासून हनुमान जयंती उत्सवापर्यंत हनुमान चालिसा सामुदायिक पठण कार्यक्रमाला शहरात प्रारंभ करण्यात आला आहे.
हनुमान जयंती उत्सवाच्या पूर्वतयारीचे आजपासून सर्वत्र नियोजन करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment