Friday, 22 March 2019

अनिता खांदवे यांना समाजभूषण पुरस्कार


नगर । प्रतिनिधी - महिलांनी आज प्रत्येक क्षेत्र काबिज केले आहे. आपल्या स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवून नावलौकिक मिळवला आहे. कलागुण हे महिलांमध्ये उपजतच असतात. त्या कलेतून शास्त्रीय दृष्टीकोन जोपासून करिअर घडवावे, असे प्रतिपादन अनिता खांदवे यांनी केले.
केडगाव येथील रहिवासी असणार्‍या अनिता खांदवे यांना त्यांनी केलेल्या कलाविष्काराची दखल घेत पुणे येथील गया फाउंडेशन व मराठवाडा विकास प्रतिष्ठान यांच्यावतीने समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले. या समारंभावेळी त्या बोलत होत्या. यावेळी माजी आमदार  उल्हास पवार, डॉ. विठ्ठलराव जाधव, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव, खा. रवींद्र गायकवाड, भाऊसाहेब जाधव, उद्योजक दिलीप माने आदी उपस्थित होते. 
यावेळी आदर्श माता पुरस्काराने पाच, समाजभूषण पुरस्काराने सात, जिजाऊरत्न पुरस्काराने सहा महिलांचा गौरव करण्यात आला. खांदवे यांनी रांगोळीच्या माध्यमातून अनेक कलाविष्कार केले आहेत. संभाजी महाराजांचा जीवनपट रांगोळीच्या माध्यमातून त्यांनी उलगडून दाखवला होता. यातील त्यांचे योगदान पाहूनच त्यांना हा सन्मान देण्यात आला.विविध स्पर्धांमधून त्यांनी 40 हून अधिक उत्कृष्ट रांगोळी रेखाटन केले आहे.

No comments:

Post a Comment