नगर । प्रतिनिधी - ज्येष्ठ साहित्यिक व सुसंस्कृत व्यक्तिमत्व यशवंतराव गडाख यांच्यासोबत झालेल्या अशोभनीय वर्तणुकीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात साहित्यिक शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना निवेदन दिले.
0यावेळी उद्योजक नरेंद्र फिरोदिया, डॉ.दीपक, जयंत येलूलकर, मा.आ.अनिल राठोड, प्रा.माणिक विधाते, मेधाताई काळे, शिवाजी साबळे, राजेंद्र गांधी, डी.एम.कांबळे, अशोक गायकवाड, पवन नाईक, संजू तनपुरे, सुरेश चव्हाण, राजेंद्र उदागे, श्रीनिवास बोजा, क्रांतीकला अनभुले, व्ही.एन देशपांडे, अंगद गायकवाड, साहेबान जहागीरदार, संतोष बलदोटा, डॉ.भूषण अनभुले, चंद्रकांत पालवे, बापू चंदनशिवे, शैलेश गवळी, ज्ञानेश शिंदे, अजित जगताप, मनीष चोपडा, अतुल रच्चा, संजय दळवी, हरिभाऊ डोळसे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यशवंतराव गडाख हे जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील अतिशय संस्कृत संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. सहकार, राजकीय, सामाजिक क्षेत्रासोबतच जिल्ह्यात सांस्कृतिक साहित्यिक जडण-घडण रुजवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या शेतकर्यांच्या प्रश्नासाठी केलेल्या आंदोलनाला संदर्भात अटकेसाठी आलेल्या पोलिसांनी यशवंतराव गडाख यांच्या यशवंत कॉलनी येथील निवासस्थानाची झडती घेतली.
पोलिसांनी अशा प्रकारचे वर्तन केल्याने त्यांना मनस्ताप झाला असून त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागला आहे. भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची खबरदारी ही अपेक्षा तसेच झालेल्या प्रकाराची आपण आपल्या स्तरावर चौकशी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment