नगर । प्रतिनिधी -
शहरातील तोफखाना परिसरातील साई सेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलग 8 व्या वर्षी श्री साईसच्चरिताचे एकदिवसीय चक्रीपारायण आयोजित केले होते. त्यास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने महिला भाविक या पारायण सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या.
तोफखाना येथील ठाकुर गल्लीतील विठ्ठल मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने गुजरात येथील गिरनार पर्वताच्या 240 पेक्षा जास्त पौर्णिमा यात्रा व 108 हून अधिक सोरटी सोमनाथची यात्रा करणारे व्यक्तिमत्व प.पू.श्री. प्रमोद केणे काका यांचे दिव्यानुभव कथनाने भाविक मंत्रमुग्ध झाले होते. त्यानंतर दुसर्या दिवशी श्री साईसच्चरिताचे एकदिवसीय चक्रीपारायण (52 अध्याय), अवतरणिका ग्रंथ वाचन (53 वा अध्याय) झाल्यानंतर साईबाबांची महाआरती झाली. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्यात उपमहापौर मालन ढोणे, अर्चना झिंजे, पूनम ढवण, अश्विनी बिज्जा यांनीही सहभाग घेतला होता. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी साईसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश झिंजे, उपाध्यक्ष राहुल बिज्जा, सचिव ऋषीकेश अष्टेकर यांच्यासह कार्यकारिणी सदस्य अमोल गुंड, अंकुश वझीरकर, अॅड. नितेश गुगळे, अमित सासवडकर, विशाल दगडे, उमेश मेरगु, मंगेश रोकडे, विक्रम पाठक, दत्तु कुलकर्णी, समीर पाठक, आशिष आचारी, अमित सद्रे, सुरेंद्र सोनवणे, शिवदिप शिंदे, प्रशांत गोसके, रवी वाघावकर, मयुर सोनेकर, राजेंद्र रामदिन, अमोल मेरगु, किशोर वडझीरकर यांच्यासह जय जिव्हेश्वर प्रतिष्ठान, बजरंग मार्कंडेय सेवा मंडळ, काळभैरवनाथ मित्रमंडळ, तोफखाना नवरात्र उत्सव मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment