नगर । प्रतिनिधी - महापालिकेच्या प्रभाग क्र. 14 मध्ये बुरूडगाव रोडवरील साईनगर येथे नगरसेवक गणेश भोसले यांच्या संकल्पनेतून आणि आ. संग्राम जगताप यांच्या मदतीने सुमारे 2 एकर जागेत साई उद्यान साकारले गेले आहे. लवकरच हे देखणे उद्यान नागरिकांसाठी खुले केले जाणार आहे.
या उद्यानाचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून या कामाची आ.संग्राम जगताप यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले.यावेळी त्यांच्यासमवेत नगरसेवक गणेश भोसले व विजय फुलसौंदर, रवी शेलोत, योगेश चंगेडीया, बापू बोरा, भरत जाखोटिया, निलेश मुथा, योगेश म्हस्के, दादासाहेब कुलाळ, सुरेश पुंड, संजय वाघ, चेतन अग्रवाल, बाळासाहेब दरेकर, लक्ष्मीकांत शेटिया आदी उपस्थित होते.
या उद्यानाच्या वैशिष्ट्यांची माहिती देताना नगरसेवक गणेश भोसले यांनी सांगितले की, बुरूडगाव रोड परिसर विकसित झाल्यामुळे या भागात लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे नागरिकांसाठी या भागात एक चांगले उद्यान असावे असे आपले मत होते. ही संकल्पना आपण आ.संग्राम जगताप यांना सांगितली. त्यांनाही ती आवडली. त्यांनी उद्यानासाठी निधी मंजूर करून दिला.
No comments:
Post a Comment