Monday, 4 March 2019

शिवमंदिरांत ‘बम बम भोले’चा जयघोष


नगर । प्रतिनिधी - महाशिवरात्रीनिमित्त नगर शहरात भगवान शंकरांच्या विविध मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होते. पहाटे अभिषेक, पूजा, महाआरती तसेच विविध ट्रस्ट, संघटना, संस्था व मंडळाच्यावतीने महाप्रसाद, फळांचे वाटप करण्यात आले. शिवालयांमध्ये ‘बम बम भोले’चा जयघोष सुरू होता. तसेच अनेक मंदिरात धार्मिक कार्यबरोबरच विविध किर्तनकार, प्रवचनकारांची किर्तने आयोजन केली होती. महाशिवरात्रीनिमित्त माळीवाडा रिक्षा स्टॉप, गणपतीची तालिम यांच्यावतीने भव्य श्री शंकराची मूर्तीची स्थापन करुन संगमनाथ महाराज यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी नीलेश खरपुडे, बजरंग भुतारे, विष्णूपंत म्हस्के, सतीश डागवाले, बाळासाहेब आरडे, विनायक आंबेकर, बाबू कावरे, खुदा घोडके, सखाराम घोडके, नवनाथ पवार, सुरेश इवळे, महेश आंबेकर, किरण दळवी, भाऊ जाधव, संजय गायकवाड, बाबा पटवेकर, रवि रांधवणे, सुनिल आंबेकर, शुभम भापकर, श्रीकांत आंबेकर, नीलेश बडे, पप्पू म्हस्के, रवी जाधव, सागर बनसोड, बोरकर आदी उपस्थित होते. 
बुर्‍हाणनगर रोडवरील बेल्हेश्वर मंदिर, नगर शहरातील सिद्धीबागेतील सिद्धेश्वर मंदिर, माळीवाडा येथील श्री कपिलेश्वर मंदिर, ओंकारेश्वर मंदिर, बुर्‍हाणनगर रोडवरील बाणेश्वर मंदिर, अर्बन बँक चौकातील अमृतेश्वर मंदिर, स्टेट बँक चौकातील विजय शंकर मंदिर, भिंगार येथील शुक्लेश्वर, फुलसौंदर मळा येथील पंचायतन मंदिरासह शहरातील शिवमंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. तसेच मंदिरावर रात्री विद्युत रोषणाई, पतका लावण्यात आल्या होत्या.

No comments:

Post a Comment