नगर । प्रतिनिधी - अशोकभाऊ फिरोदिया चॅरिटेबल ट्रस्ट, अ.नगर एज्युकेशन सोसायटी व जिल्हा क्रिकेट, व्हॉलीबॉल व कबड्डी असो. आयोजित अशोकभाऊ फिरोदिया स्मृती करंडक शालेय व खुल्या क्रिकेट, व्हॉलीबॉल व कबड्डी स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते व एल. टी चे महाव्यवस्थापक अरविंद पारगावकर , अ.नगर एज्युकेशन सोसायटी कार्यवाह छायाताई फिरोदिया, सहकार्यवाह गौरव फिरोदिया यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी,जिल्हा कबड्डी असो.चे अध्यक्ष श्री.दादाभाऊ कळमकर,व्हॉलीबॉल असो.चे एल.बी.म्हस्के, प्रकाश गांधी, अॅड. के.एम.देशपांडे, गौरव मिरीकर, हेमंत मुथा, प्रा. माणिक विधाते, प्रा.सुनील जाधव,गणेश गोंडाळ,ज्ञानदेव पांडुळे व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महापौर वाकळे म्हणाले की, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रात फिरोदिया परिवाराचे योगदान पाहता नगर शहराची नवी ओळख निर्माण होईल. क्रीडा क्षेत्राला यामुळे पोषक वातावरण झाले असून चांगले खेळाडू निर्माण होतील. लवकरच या ठिकाणी रणजी क्रिकेट सामने व्हावेत यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.
अरविंद पारगावकर म्हणाले की, उत्कृष्ट नियोजनाने या सर्व स्पर्धा गाजल्या असून क्रीडा क्षेत्रासाठी गौरव फिरोदिया यांनी सुरु केलेला नवा प्रवास व धोरण नगरच्या नव्हे तर राज्यातील खेळाडूंना अत्यंत लाभदायक ठरेल. खेळाकडे वाढते आकर्षण व फिरोदिया ट्रस्टचे कार्य पाहता उद्योजकांचा यात सहभाग कसा वाढेल यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
प्रास्ताविक व स्वागतात श्रीमती छायाताई फिरोदिया म्हणाल्या की, आज खेळाकडे मुलांचे दुर्लक्ष होत असून त्यांना खेळाकडे आकर्षण वाढावे यासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यासाठी विविध खेळांच्या राज्य व जिल्हास्तरीय संघटनांनी सहकार्य केले तसेच संस्थेच्या सर्व शाळातील मुख्याध्यापक,शिक्षक,कर्मचारी यांनी अतिशय परिश्रम घेतल्यामुळे या स्पर्धा यशस्वी झाल्या.
राज्यस्तरावरील खेळाडूंना विविध क्रीडा स्पर्धांचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हा क्रिकेट असो.व संघटनेतर्फे प्रा.माणिक विधाते,गणेश गोंडाळ, विजय म्हस्के, शैलेश गवळी यांनी गौरव फिरोदिया यांचा विशेष सत्कार केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश बुरा यांनी केले तर आभार अॅड.गौरव मिरीकर यांनी मानले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी रावसाहेब बाबर, कैलास साबळे, संजय विटनोर, मंगेश उपासनी, प्रमोद रामदिन कैलास करपे, प्रीतम जाधव, आकाश थोरात यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, क्रीडाप्रेमी, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment