नगर । प्रतिनिधी - येथील रेडिओ धमालच्या रेडिओ जॉकी (आरजे), महानगर न्यूजच्या वृत्त निवेदिका सौ. मनीषा इंगळे-जोशी यांना यावर्षीचा अप्रतिम चौथा स्तंभ पुरस्कार रेडिओ पत्रकारिता गटातून जाहीर झाला आहे. दि युनिसेफ, वृत्तपत्रविद्या विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि अप्रतिम मीडिया फाउंडेशनने आयोजित केलेल्या एकदिवसीय कार्यशाळेत या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
पर्यावरण ते राजकारण या क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण पत्रकारिता करणार्या पत्रकारांना ही संस्था राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविते. यावर्षी रेडिओ विभागात सौ. इंगळे-जोशी यांची निवड झाली. रेडिओ धमाल व आकाशवाणीत रेडिओ जॉकी म्हणून काम केलेल्या सौ. इंगळे-जोशी यांचे मॉनिर्ंगपूर, खुसुर फुसूर, धडकन, युवा मंच हे कार्यक्रम लोकप्रिय आहेत. स्थानिक वृत्तवाहिनीवर तसेच लेटस्अप, व्हाटस्अप वाणी आणि मी मराठी या ऑडिओ बुलेटिनवर त्या वृत्तनिवेदक म्हणून काम करतात. ऑडिओ-व्हिडीओ जाहिरातीसाठी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून देखील त्यांचा नावलौकिक आहे.
No comments:
Post a Comment