नगर । प्रतिनिधी - सोनई (ता. नेवासा) पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस हवालदार सचिन वसंत पवार यांना नुकतेच केंद्रीय गृहमंत्री यांच्या उत्कृष्ट प्रशिक्षक पदकाने सन्मानित करण्यात आले. जालना येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्रजासत्ताक दिनी झालेल्या समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत उत्कृष्ट प्रशिक्षक पदक व प्रशस्तिपत्र देऊन श्री. पवार यांचा गौरव करण्यात आला.
जालना येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असताना सचिन पवार यांचा केंद्रीय गृहमंत्र्यांकडे उत्कृष्ट प्रशिक्षक पदकासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याअंतर्गत सन 2015-16च्या बॅचमधून ही निवड झाली. याबद्दल पवार यांचे अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment