Tuesday, 22 January 2019

राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेत नगरच्या पोलिसांचे यश


नगर । प्रतिनिधी -  नागापूर येथे नुकत्याच झालेल्या 31 व्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेत नगर जिल्ह्यातील पोलिसांनी यश मिळविले. या पोलिसांचा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर अधीक्षक जयंत मीना यांनी सत्कार केला.
तायक्वांदो स्पर्धेत पोलिस कॉन्स्टेबल कोमल सुरेश शिंदे, बुशु व बॉक्सिंग या दोन स्पर्धेत पोलिस नाईक मनीषा विष्णू निमोणकर आणि ज्युदो स्पर्धेत पोलिस कॉन्स्टेबल गौरव राजेंद्र दुर्गुळे यांनी सुवर्णपदक पटकाविले. तायक्वांदो स्पर्धेत पोलिस कॉन्स्टेबल प्रितम दगडू गायकवाड व बॉस्किंग स्पर्धेत पोलिस कॉन्स्टेबल कोमल सुरेश शिंदे यांनी रौप्य पदक मिळविले. 
तर बास्केट बॉल स्पर्धेत पोलिस कॉन्स्टेबल धिरज किसन अभंग व कपिल श्रीराम गायकवाड यांनी कांस्य पदक पटकाविले. तसेच गौरव दुर्गुळे यांना ज्युदो या खेळात उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. या सर्व खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment