नगर । प्रतिनिधी - अखिल गुरव समाज संघटना, व जिल्हा गुरव समाज सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात प्रथमच व्रतबंध (मुंजी) सोहळा, तसेच गुरव समाजबांधवांचा मेळावा आणि वधू-वर मेळावा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमानिमित्त गुरव समाजबांधव जिल्हाभरातून मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अखिल गुरव समाज संघटनेेचे अध्यक्ष अॅड. अण्णासाहेब शिंदे, महिला प्रदेशाध्यक्षा सुरेखा तोरडमल, शिवसेना उपनेते अनिल राठोड, उपमहापौर मालनताई ढोणे, संदीप कर्डिले, दादाभाऊ तापकिरे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्तात्रय मसुरकर, रंगनाथ गुरव, बंडूशेठ खंडागळे, नवल शेवाळे, सुधीर लांडगे, अॅड. सुरेश कौदरे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी सामुदायिक व्रतबंध सोहळ्यानिमित्त बटूंची नगर शहरातून ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. हा सोहळा वैदिक पद्धतीने मोठ्या थाटात व उत्साहात झाला. बटूंना पळी भांडे, तामण, गडवा, भिक्षावळ लाडू, तसेच धार्मिक विधी व त्यासाठी लागणारे साहित्य संघटनेने दिले. या सर्व कार्यक्रमास उपस्थितांना चहा व नाश्त्याची सोय करण्यात आली होती, तसेच मिष्टान्न भोजनही देण्यात आले.
कार्यक्रमांचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल यावेळी अखिल गुरव समाज संघटनेेचे अध्यक्ष अॅड. अण्णासाहेब शिंदे यांच्या हस्ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
नगरच्या संयोजन समितीने पुढील वर्षी अखिल भारतीय गुरव समाज संघटनेचा राज्यव्यापी मेळावा, वधूवर मेळावा, तसेच सामुदायिक व्रतबंध सोहळा आयोजित करण्याचा मानस याप्रसंगी व्यक्त केला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल तोरडमल, महिला जिल्हाध्यक्ष स्मिता शेलार, महेश शिर्के, नरेश भालेराव, पंकज काळे, शिवाजी शेलार, प्रशांत शेलार, डॉ. सुरेश थोरात, सुधाकर शिंदे, अरविंद आचार्य, उमेश शिर्के आदींनी प्रयत्न केले.
No comments:
Post a Comment