Monday, 21 January 2019

राजासाहब वाईन्सचे गोडाऊन फोडले


नगर । प्रतिनिधी - स्टेशन रस्त्यावरील राजासाहब वाईन्सच्या गोडाऊनचा दरवाजा उचकटून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 15 ते 20 लाख रुपयांचा मद्यसाठा लांबविला आहे. याप्रकरणी दुपारी उशिरापर्यंत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.
स्टेशन रस्त्यावर राजासाहब वाईन्सचे दुकान आहे. या दुकानाच्या पाठीमागील बाजूस गोडाऊन असून यामध्ये मद्यसाठा ठेवण्यात येतो. अज्ञात चोरट्याने पहाटेच्या सुमारास गोडाऊनचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. गोडाऊनमधील सुमारे 15 ते 20 लाख रुपये किमतीची देशी-विदेशी दारू चोरट्यांनी लांबविली. चोरीचा हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. 
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक जयंत मिना, उपअधीक्षक संदीप मिटके, पोलिस नितीन गोकावे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याप्रकरणी दुपारी उशिरापर्यंत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता.

No comments:

Post a Comment