नगर । प्रतिनिधी - श्री. शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशन व शिवाजीयन्स क्लबतर्फे सप्टेंबर 2018 मध्ये आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा झाली. यावेळी झालेल्या क्लिक द किक छायाचित्र स्पर्धेतील विजेत्यांना चित्रपट कलाकार सिद्धार्थ जाधव, प्रवीण तरडे, फौंडेशनच्या आशाताई फिरोदिया, नरेंद्र फिरोदिया यांच्याहस्ते पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धेतील प्रथम विजेते रमेश गव्हाणे यांना पाच हजार रुपये व प्रमाणपत्र, द्वितीय विठ्ठल कुसळकर तीन हजार रुपये व प्रमाणपत्र, तृतीय विभागून मंदार साबळे व साजिद शेख पंधराशे रुपये व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ - राहुल आंग्रे, आशिष राऊत, संदीप कांबळे प्रत्येकी 500 रुपये व प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात आले.
या छायाचित्रांचे प्रदर्शन अ.नगर महाकरंडक नाट्य एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने माऊली सभागृहात लावण्यात आले होते. नाट्यस्पर्धेसाठी आलेल्या राज्यातील विविध संघांनी व नगरच्या रसिकांनी या प्रदर्शनास भेट दिली.
छायाचित्र स्पर्धेतील सर्व विजेते व सहभागी छायाचित्रकारांचे नरेंद्र फिरोदिया, शिवाजीयंस क्लबचे वाळवेकर, नमिता फिरोदिया, रिंकू फिरोदिया, विक्रम फिरोदिया यांनी अभिनंदन केले. या उपक्रमासाठी जितेंद्र अग्रवाल, अमित झिरपे, अविनाश शिरापुरे, चैतन्य चौकर, पल्लवी सेंदाणे यांचे विशेष सहकार्य मिळाले. प्रसिद्ध शिल्पकार शुभंकर कांबळे, क्रीडा शिक्षक लोळगे व प्रदर्शन पाहणार्या काही रसिकांनी परीक्षणासाठी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment