नगर । प्रतिनिधी - घराणेशाहीसारखे बिनबुडाचे आरोप करणार्या विरोधकांना सुजय विखे का नको? याचे उत्तर द्यावे. उलट आपल्या सोयीच्या राजकारणात सुजय विखे अडचणीचा ठरेल अशी भीती त्यांच्या मनात असल्यामुळे मला पुढार्यांचा विरोध वाढू लागला आहे. गेली अनेक वर्ष अकार्यक्षम खासदाराला निवडून दिल्यामुळे स्थानिक पातळीवरच्या आपल्या अकार्यक्षमेतला विरोध करणारा, सामान्यांच्या प्रश्नांसाठी भांडणार्या पुढार्यांना जाब विचारणारा कोणी राहिला नाही. त्यामुळे ‘पुढारी तुपाशी तर जनता उपाशी’ अशी अवस्था बघायला मिळते, परंतु मला संधी मिळल्यास गल्लीपासून दिल्लीपर्यंत सामान्यांच्या प्रश्नांना बगल देणार्या पुढार्याची झोप उडवल्याशिवाय आपण राहणार नाही, असा सज्जड इशारा डॉ. सुजय विखे यांनी पाथर्डी तालुक्यातील स्नेह मेळाव्यात बोलताना दिला.
जनसेवा फांऊडेशनच्या वतीने हंडाळवाडी (ता. पाथर्डी) येथे कार्यकर्त्यांच्या स्नेहमेळाव्यात मार्गदर्शन करताना विखे बोलत होते. या प्रसंगी पाथर्डी नगरपालिकेचे नगराध्यक्ष अभय आव्हाड, बंडु बोरुडे, प्रतीक खेडकर, डॉ.पांडुरंग हंडाळ, हंडाळवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनसेवा फांऊडेशनने पाथर्डी तालुक्यात विविध उपक्रम आयोजित केले होते. आपल्या पाथर्डी तालुक्याचा दौर्याची सुरुवात डॉ. विखे यांनी चारा छावणीस भेट देऊन केली. यानंतर त्यांच्या हस्ते डॉ. विखे पाटील हॉस्पीटल आयोजित मोफत सर्वरोग निदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
त्यानंतर डॉ. विखे यांनी हंडाळवाडी, इंदिरानगर येथील रहिवाशांशी संवाद साधला. हंडाळवाडी येथे ग्रामस्थांना संबोधित करताना डॉ. विखे यांनी आपल्याला कुठलाच पक्ष उमेदवारी देत नाही याबद्दल आश्चर्य वाटते. पक्षाच्या उमेदवारीचे निकष जर जनसेवा, जनसंपर्क व लोकांचे प्रश्न सोडवण्याची जिद्द असेल तर मग आपण कुठल्या निकषात कमी पडतो? याचा उलगडा मला झालेला नाही. उलट त्या सवार्र्ंचे सेटींग राजकारण अडचणीत आणेल, गोरगरिबांना व्यासपीठ मिळवून देईल याची भीती त्यांना वाटत असेल त्यामुळे मला विरोध होत असावा असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
No comments:
Post a Comment