नगर । प्रतिनिधी - दिवसेंदिवस शिक्षण क्षेत्रात नवीन नवीन अभ्यासक्रम येत आहेत. स्पर्धेच्या युगात मातृभाषेबरोबर इंग्रजीलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. ग्रामीण भागातही अनेक होतकरू, गुणवंत विद्यार्थी आहेत. परंतु शिक्षण क्षेत्रात काळानुरूप बदल होत गेल्यामुळे करिअरच्या संधी देखील बदलत गेल्या आहेत. या संधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी माहीत करून घेतल्या पाहिजे. कर्डिले ब्युरो नर्सिंग होम संस्थेने मागील अनेक वर्षांपासून अनेक होतकरू विद्यार्थी घडविले आहेत. राज्यात विविध हॉस्पिटलमध्ये येथील विद्यार्थी कार्यरत आहेत, असे प्रतिपादन जि. प. सदस्य माधवराव लामखडे यांनी केले.
कर्डिले ब्युरो नर्सिंग होम संस्थेच्या बाबुर्डी घुमट (ता. नगर) येथील लक्ष्मीबाई इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल, किड स्टार प्री प्रायमरी स्कूल व यश इन्स्टिट्यूट ऑफ अलाईड हेल्थ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजीचे उदघाटन सखाराम कर्डिले व लक्ष्मीबाई कर्डिले यांच्या हस्ते झाले. यावेळी श्री. लामखडे बोलत होते.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संतोष कर्डिले, प्राचार्या मंगल कर्डिले, कांतीलाल कांडेकर, आबासाहेब कर्डिले, राजेंद्र जरे, सविता कर्डिले, नगरसेवक अमोल येवले, अशोक कर्डिले, संतोष कर्डिले, भास्कर कराळे, कांतीलाल माने, सरपंच सविता कर्डिले, जनार्दन माने, बी. आर. कर्डिले, डॉ. संतोष पोटे, डॉ. पानगे, डॉ. इमलवार आदी उपस्थित होते.सिव्हील हॉस्पिटलचे माजी अधीक्षक कांतीलाल कांडेकर म्हणाले की, मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये लॅब असिस्टंट, सिटी स्कॅन टेक्निशिअन, डायलीसीस टेक्निशिअन, कॅथलॅब टेक्निशिअन अशा प्रकारची अनेक पदे असतात. परंतु हे कोर्सेस करणारे तुलनेत कमी आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी नगण्यच आहेत. त्यामुळेच मुलांनी या कोर्सेसकडे करिअर म्हणून पहावे. प्राचार्या मंगला कर्डिले यांनी ही संस्था सुरू करण्यामागे ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून करिअरच्या नवनवीन संधी त्यांना उपलब्ध करून देण्याचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.
सूत्रसंचालन दीपक कर्डिले यांनी केले, तर अशोक कर्डिले यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment