नगर । प्रतिनिधी - नवी दिल्ली येथील श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स ही श्रमण संघाची मातृसंस्था असून गत 113 वर्षे सकल समाजाची जडण-घडण या संस्थेने केली आहे. या संस्थेत आजपर्यंत कार्य करणार्या अध्यक्ष आणि त्यांच्या पदाधिकार्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळेच दिल्लीसारख्या राजधानीत आपल्या जैन समाजाचे मुख्यालय असणे ही समाजासाठी मोठ्या गर्वाची बाब आहे. माजी अध्यक्षांच्या पावलावर पाऊल ठेवून संस्काराचे प्रतिबिंब उमटवत नवनिर्वाचित अध्यक्ष पारस मोदी जैन आणि त्यांचे सर्व 14 प्रांतातील सहकारी संस्था प्रगतीपथावर नेतील, असा विश्वास प्रभुध्द विचारक आदर्शऋषीजी महाराज यांनी व्यक्त केला.
श्री ऑल इंडिया श्वेतांबर जैन कॉन्फरन्स, नवी दिल्ली या संस्थेचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष पारस मोदी जैन आणि त्यांचे सर्व नवोदित सहकारी, पदाधिकारी व देशातील सर्व संभागीय कार्यकारिणीचा शपथविधी नगरमधील आनंदधाम येथे पार पडला. यावेळी गुरु भगवंतांचे व साध्वीजींच्यावतीने आशीर्वचन देतांना आदर्शऋषिजी म. सा. बोलत होते.
पी. एच. जैन परिवारातर्फे महिला व युवती सदस्यांनी स्वागत गीत सादर केले. महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य श्री. कुंदनऋषीजी महाराज यांनी मुंबईच्या पी. एच. जैन परिवार त्याचे प्रमुख कॉन्फ्रेंसचे माजी अध्यक्ष कांतीलाल जैन यांचा नामोल्लेख करुन पारस मोदी जैन यांच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. छाया मोदी जैन यांनी मंगलाचरण सादर केले. शिल्पा, पूनम, खुशबू, हर्षदा व प्राची मोदी-ब्रम्हेचा जैन यांनी स्वागतगीत सादर केले. पाहुण्यांचे स्वागत सुनंदा ब्रम्हेचा जैन, सुनीता, दीपाली, वैशाली, मनाली, रक्षणा यांनी गीतरुपाने केले. सूत्रसंचालन नूतन कार्याध्यक्ष बालचंद खरवड यांनी केले. इशिता मोदी जैन हिने पारस मोदी यांच्यासाठी शुभेच्छा गीत सादर केले. यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी डी. डी. खाबिया, उपअधिकारी राजीव जैन, अजित छल्लाणी यांचा सत्कार पी.एच.जैन परिवारातर्फे करण्यात आला. अनिल जैन, विवेक जैन, उमेश जैन, विशाल जैन, चिराग व राजेश जैन यांनी या अधिकार्यांचे आभार मानले. मुख्य निवडणूक अधिकार्यांनी नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मोदी जैन यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. पंचम झोनच्या महिला अध्यक्षा सुरेखा कटारिया यांनी पारस मोदी यांच्या कार्याची महिती सादर करणारी डॉक्युमेंटरी जैन समाज का चमकता सितारा प्रदर्शित केली. आरवी अमित मोदी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी नूतन राष्ट्रीय महामंत्री शशिकांत कर्नावट, कोषाध्यक्ष विमल जैन व पदाधिकार्यांना शपथ देण्यात आली. यावेळी अहमदनगर जैन श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत यांनी मोदी यांना शुभेच्छा दिल्या.
माजी अध्यक्ष मोहनलाल चोपडा, राष्ट्रीय महामंत्री अशोक पगारिया यांना सन्मानपत्र देण्यात आले. या कार्यक्रमास देशभरातील 3000 हून अधिक सदस्य उपस्थित होते. कॉन्फे्रंसच्या 1 ते 5 झोन असलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा शपथविधी समारंभ नूतन अध्यक्ष मोदी यांच्याहस्ते झाला. यावेळी माजी अध्यक्ष केसरीमल बुरड जैन, जी. डी. जैन, अविनाश चोरडिया व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्नावट शशिकांत यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment