नगर । प्रतिनिधी - राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने मतदार जनजागृतीसाठी वाडिया पार्क मैदान येथून भव्य मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते आज (शुक्रवारी) करण्यात आला.
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, एल अँड टी कंपनीचे अरविंद पारगावकर, कर्नल सुकेश वर्मा, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, पराग नवलकर, आदर्श रेड्डी, तहसीलदार अप्पासाहेब शिंदे, विलास वालगुडे आदी उपस्थित होते. स्पर्धेत जिल्हाधिकार्यांनी सात कि.मी.चे अंतर पूर्ण केले. विकलांगही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी 100 वर्षे पूर्ण करणार्या ज्येष्ठ मतदार जानकाबाई शंकर देवीकर यांचा गौरव करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
No comments:
Post a Comment