Thursday, 24 January 2019

सारडा महाविद्यालयात साडी व टाय डे उत्साहात


नगर । प्रतिनिधी - शहरातील पेमराज सारडा महाविद्यालयात साडी व टाय डे साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थिनी नववारी, सहावारी, पार्टीवेअर साड्या नेसून आल्या होत्या तर विद्यार्थी पॅन्ट-शर्ट, टाय घालून आले होते. यावेळी विद्यार्थिनी व विद्यार्थी वेगवेगळ्या पोजमध्ये सेल्फी घेण्यात मग्न झाले होते. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अमरजा रेखी यांनाही या नटून आलेल्या विद्यार्थिनींबरोबर सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही.सारडा महाविद्यालयात स्नेहसंमेलन सुरू झाले आहे. यानिमित्त विविध उपक्रम राबविले जात आहेत. तसेच विविध स्पर्धा, डेज् चे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी प्राचार्या डॉ. रेखी म्हणाल्या, स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांसाठी आनंद लुटण्याचे दिवस असतात. त्यासाठीच सारडा महाविद्यालय दरवर्षी जानेवारी महिन्यात 5 दिवस स्नेहसंमेलन साजरे करून विद्यार्थ्यांना विविध कार्यक्रमांची पर्वणीच देत असते. विद्यार्थी मोठ्या उत्साहात या सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होतात. रोजच्या अभ्यासाच्या ताणातून थोडी मोकळीक यामुळे मिळत असली तरी सर्व कार्यक्रम शिस्तीत होत असतात.
स्नेहसंमेलनचे कार्याध्यक्ष प्रा. संजय धोपावकर यांनी सर्व कार्यक्रमांचे नियोजन केले असून त्यांना सर्व प्राध्यापक साथ देत आहेत.

No comments:

Post a Comment