नगर । प्रतिनिधी - व्हिडीओकॉनचे मालक वेणुगोपाल धूत आणि आयसीआयसीआय बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांचे पती दीपक यांच्याविरूध्द कर्जप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, वेणुगोपाल धूत यांच्या व्हिडीओकॉन ग्रुपला 20 बँकांच्या ग्रुपने कर्ज दिले होते. ज्यात आयसीआयसीआय बँकेचा वाटा 10 टक्के होता. मात्र धूत यांनी आयसीआयसीआय बँकेकडून मिळणार्या बर्जाच्या बदल्यात चंदा कोचर यांचे पती दीपकयांच्यासोबत मिळून न्यू पॉवर रिन्यूएबल नावाने कंपनी उघडली. ज्यात दीपक यांची 50 टक्क्यांची भागीदारी होती. हा सरळ सरळ भ्रष्टाचार असल्याचा आरोप करत शेअरहोल्डर अरविंद गुप्तांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून तक्रार केली होती.धूत आणि आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि त्यांच्या दोन नातेवाईकांनी मिळून डिसेंबर 2008 मध्ये एक कंपनी स्थापन केली.या कंपनीला घरच्याच आयसीआयसीआय बँकेने तब्बल 64 कोटी रूपयांचे कर्ज दिले. मात्र अवघ्या काही दिवसात या कंपनीची मालकी अवघ्या 9 लाख रूपयात दीपक कोचर यांना मिळाली.या प्रकरणी धूत व दीपक कोचर यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला असून मुंबई आणि औरंगाबादमध्ये सीबीआयकडून व्हिडीओकॉन आणि सुप्रीम एनर्जीच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले.धूत यांच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील आणि नरीमन पॉईंट येथील कार्यालयांमध्ये सध्या सीबीआयची टीम चौकशी करत आहे.
No comments:
Post a Comment