नगर । प्रतिनिधी - वाढती लोकसंख्या तसेच शेतीतून कमी होणारी उत्पादकता या गोष्टी पाहिल्यास आजच्या काळात औद्योगिकीकरणाची गरज वाढली आहे. आज संपूर्ण जगात औद्योगिक उत्पादनात चीन आघाडीवर आहे. या देशाने संशोधन करून अनेक गोष्टींचे पेटंट मिळवण्यावर भर दिला. त्यामुळे त्यांची उत्पादकता वाढली आहे. भारतातही औद्योगिक वाढीसाठी अधिकाधिक संशोधन होण्याची गरज आहे. त्यामुळे आपणही चीनप्रमाणेच मोठी झेप घेऊ शकतो. महाट्रेड फेअरसारखे उपक्रम अशा गोष्टींना पूरक वातावरण तयार करतील, असा विश्वास महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केला.
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्यावतीने (जितो) नगर-पुणे रस्त्यावरील केडगाव इंडस्ट्रीयल इस्टेटसमोरील भव्य प्रांगणात आयोजित जितो महाट्रेड फेअर 2019 चे उद्घाटन आज (गुरुवार) सकाळी विधानसभेचे अध्यक्ष बागडे यांच्याहस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खा. दिलीप गांधी, आ. संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, जितो अपेक्सचे अध्यक्ष गणपतराज चौधरी, सचिव अनिल जैन, उपाध्यक्ष विजय भंडारी, जितो रॉमचे अध्यक्ष राजेश साकला, सीए रमेश फिरोदिया, मर्चंटस बँकेचे संस्थापक-संचालक हस्तीमल मुनोत, जितो अहमदनगरचे अध्यक्ष गौतम मुनोत, सचिव अमित मुथा, महाट्रेड फेअरचे प्रोजेक्ट अध्यक्ष जवाहर मुथा आदी मान्यवर उपस्थित होते.श्री. बागडे म्हणाले की, नगर शहर व संपूर्ण नगर जिल्हा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला आहे. सहकारापासून अनेक चांगल्या गोष्टींची सुरूवात याच मातीत झाली आहे. त्यामुळे येथे होत असलेला जितो महाट्रेड फेअरचा उपक्रमही अनेक अर्थांने वेगळा ठरुन येथील औद्योगिक विकासाला गती मिळेल, असेही ते म्हणाले.उद्घाटनानंतर अध्यक्ष बागडे यांच्यासह मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट देऊन येथील स्टॉल्सची पाहणी केली. नगरची ऐतिहासिक ओळख दर्शवणार्या रिव्हिलिंग द ट्र्रू आयडेंटी अहमदनगर या प्रदर्शनालाही सर्वांनी भेट दिली.प्रास्ताविक जितो अहमदनगरचे अध्यक्ष गौतम मुनोत यांनी केले. ते म्हणाले, सहा महिन्यांपूर्वी जितो नगर शाखेची सुरूवात झाली. तेव्हाच आम्ही जितोच्या माध्यमातून भव्य महाट्रेड फेअर घेण्याचे ठरवले होते. त्याची तयारी सुरू केल्यावर सर्वांनीच आम्हाला पाठबळ दिले. जे आपल्याकडे आहे, ते ओळखून त्यातून प्रगती साधावी, सर्वांना प्रगतीच्या दिशेने न्यावे, असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या महाट्रेड फेअरची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. येणार्या काळात दर दोन वर्षांनी असे महाट्रेड फेअर नगरमध्ये घेण्याचा आमचा मानस आहे.जवाहर मुथा म्हणाले, दि. 28 जानेवारीपर्यंत चालणार्या पाच दिवसांच्या भव्यदिव्य महाट्रेड फेअरमध्ये कृषी, उत्पादने, आय.टी, टेलिकॉम, शिक्षण, ग्राहकोपयोगी उत्पादने, अपना बाजार, अॅटोमोबाईल, बांधकाम साहित्य, रियल इस्टेट, अंतर्गत सजावट, लघु उद्योगाशी, महिलांसाठी घरगुती उद्योगाशी संबधित दालने यांचे 350 हून अधिक स्टॉल्स आहेत. या प्रदर्शनासाठी आवर्जुन स्टार्ट अप इंडिया आणि इतर फ्रँचाईजना निमंत्रित केले. त्यांचे स्टॉल या प्रदर्शनात आहेत. यातून नवीन वेगळा उद्योग, व्यवसाय करू इच्छिणार्या नगरकरांना 500 ते 600 वेगवेगळ्या व्यावसायिक संधी उपलब्ध होतील. आ. संग्राम जगताप म्हणाले, नगरमधील जितोच्या पदाधिकार्यांनी कमी वेळेत मोठी झेप घेत या महाट्रेड फेअरचे सुुंदर आयोजन केले आहे. नगरचा ऐतिहासिक वारसा जपतानाच आधुनिकतेकडे वाटचाल करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने गेल्या चार वर्षांत जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहेत. शहरात उद्योग उभारणीसाठी अनेक मोठ्या कंपन्या उत्सुक आहेत. त्यासाठी जागा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. जितो महाट्रेड फेअरमुळे नवीन व्यवसाय, व्यापार, शैक्षणिक संधींची माहिती नगरकरांना होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांच्यासह जितोच्या राष्ट्रीय तसेच राज्य पदाधिकार्यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. प्रसाद बेडेकर यांनी केले. जितो अहमदनगरचे सेक्रेटरी अमित मुथा यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment